वोडाफोननंतर आता एअरटेलचे रिचार्जही महागले, नव्या प्लॅनची किंमत किती?

वोडाफोन-आयडियानंतर आता एअरटेल रिचार्जच्याही किमतीत वाढ करण्यात आली आहे. एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांच्या कॉल आणि इंटरनेट डाटा प्लॅनच्या किमतीतही वाढ होणार आहे, अशी घोषणा आज (1 डिसेंबर) एअरटेलने केली आहे.

वोडाफोननंतर आता एअरटेलचे रिचार्जही महागले, नव्या प्लॅनची किंमत किती?

मुंबई : वोडाफोन-आयडियानंतर आता एअरटेल रिचार्जच्याही किमतीत वाढ करण्यात आली आहे. एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांच्या कॉल आणि इंटरनेट डाटा प्लॅनच्या किमतीतही वाढ होणार आहे, अशी घोषणा आज (1 डिसेंबर) एअरटेलने केली आहे. याआधी वोडाफोन आणि आयडियानेही कॉल आणि इंटरनेट डाटाच्या किमतीत (Airtel and vodafone recharge price hike) वाढ केली होती.

“भारती एअरटेलने प्रीपेडच्या कॉल आणि इंटरनेट रिचार्जच्या किमतीत वाढ (Airtel and vodafone recharge price hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे दर 3 डिसेंबर 2019 पासून लागू होणार आहे. हे नवीन प्लॅन पहिल्यापेक्षा 42 टक्क्यांनी महागणार आहेत. तसेच कंपनीचा आता सर्वात स्वस्त प्लॅन हा 49 रुपयांचा असणार आहे”, असं भारती एअरटेलने सांगितले.

नवीन रिचार्ज प्लॅननुसार, जकात दरात प्रति दिन 50 पैसे ते 2.50 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय कंपनी एअरटेल थँक्स प्लॅटफॉर्मच्या आधारावर ग्राहकांना एक्स्क्लुझिव्ह ऑफर देणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना एअरटेल एक्सट्रीम अॅपवर प्रीमियम कन्टेंट मिळू शकेल. यामध्ये ग्राहकांना दहा हजार चित्रपट, एक्सक्लुझिव्ह शो, 400 टीव्ही चॅनेल, विंक म्युझिक, अँटी व्हायरससह डिव्हाईस प्रोटेक्शनची सुविधा दिली जाईल, असंही कंपनीने सांगितले.

वोडाफोनच्याही कॉल दरात 42 टक्क्यांची वाढ

काही तासांपूर्वी वोडाफोन-आयडियाने आपल्या कॉल आणि इंटरनेट सेवेत वाढ केली आहे. कंपनीने प्रीपेड युजर्ससाठी दोन दिवस, 28 दिवस, 84 दिवस आणि 365 दिवसांच्या नव्या प्लॅनची घोषणा केली. वोडाफोनही कॉल दरात 42 टक्क्यांची वाढ करत असल्याची घोषणा केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *