Tik Tok ला टक्कर देण्यासाठी भारतीय Mitron अॅप लाँच, महिनाभरात तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक युझर्स

शॉर्ट व्हिडीओ मेकिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक अॅपला टक्कर देण्यासाठी देशात आता Mitron अॅप लाँच करण्यात आला (Tik Tok vs Mitron App) आहे.

Tik Tok ला टक्कर देण्यासाठी भारतीय Mitron अॅप लाँच, महिनाभरात तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक युझर्स

मुंबई : शॉर्ट व्हिडीओ मेकिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक अॅपला टक्कर देण्यासाठी देशात आता Mitron अॅप लाँच करण्यात आला (Tik Tok vs Mitron App) आहे. Mitron अॅप लाँच होऊन आतापर्यंत एक महिना झाला असून हा अॅप 50 लाखांपेक्षा अधिक युझर्सने डाऊनलोड (Tik Tok vs Mitron App) केला आहे.

सध्या चायनीज कंपनी बाईटडान्सचा टिकटॉक अॅप वादाता सापडला आहे. अशा परिस्थितीत आता Mitron अॅप युझर्समध्ये प्रसिद्ध होत आहे. अनेकजण हा अॅप डाऊनलोड करत आहेत.

हा अॅप रुरकी येथील आयआयटीचा विद्यार्थी शिवांक अग्रवालने तयार केला आहे. हा अॅप सध्या गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. 50 लाखांपेक्षा अधिक युझर्सने हा अॅप आता डाऊनलोड केला आहे. Mitron अॅपला इतकी प्रसिद्धी मिळाली आहे की, गूगल प्ले स्टोअरच्या टॉप 10 अॅपच्या यादीत या अॅपने स्थान मिळवले आहे.

पेटीएमचे माजी सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट दीपक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो ट्वीट केला आहे. ज्यामध्ये गूगल प्ले स्टोअरच्या टॉप फ्री अॅपच्या यादीत Mitron अॅप दुसऱ्या स्थानी आहे. या फोटोवरुन अंदाज येतो एका महिन्यात या अॅपने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवलेली आहे.

या अॅपमध्ये सर्वाधित टिकटॉक फीचर्स आहेत. पण नवीन असल्याने खूप सारे बग्स सुद्धा आहेत. बरेच बग्स असूनही युझर्स या अॅपला पॉझिटिव्ह रिव्ह्यू आणि चांगली रेटिंग देत आहेत. जर अॅपमधून काही बग्स आणि तांत्रिक अडचणी दूर केल्या तर येणाऱ्या काही दिवसात हा अॅप आणखी प्रसिद्ध होऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनदरम्यान Whatsapp कडून युझर्ससाठी नवं फीचर लाँच

‘झूम’ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप सुरक्षित नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून धोक्याचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *