'या' मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार!

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखलं जातं. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवे फीचर घेऊन येतं. मात्र व्हॉट्सअॅप काही युजर्सना धक्का देणार आहे. 31 डिसेंबर 2018 नंतर व्हॉट्सअॅप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये आपली सेवा बंद करणार आहे. म्हणजेच जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर सुरु असलेल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप आता चालणार नाही. कोणत्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद? …

'या' मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार!

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखलं जातं. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवे फीचर घेऊन येतं. मात्र व्हॉट्सअॅप काही युजर्सना धक्का देणार आहे. 31 डिसेंबर 2018 नंतर व्हॉट्सअॅप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये आपली सेवा बंद करणार आहे. म्हणजेच जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर सुरु असलेल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप आता चालणार नाही.

कोणत्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद?

Nokia च्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोनमध्ये युजर्सना 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. ही ऑपरेटिंग सिस्टिम Nokia S40 असून या ऑपरेटिंग सिस्टिमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होईल. या फोनमधील सध्याचे फीचर्स कधीही बंद होऊ शकतात.

1 फेब्रुवारी 2020 नंतर अनेक मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद

याशिवाय Android 2.3.7 आणि त्यापेक्षा जुन्या व्हर्जनसह iPhone iOS7 आणि त्यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर 1 फेब्रुवारी 2020 नंतर व्हॉट्सअॅप बंद होईल. या व्हर्जन्सवर आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करु शकत नाही, त्यामुळे इथे व्हॉट्सअॅपची सेवा बंद करावी लागत असल्याचं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. यापूर्वी Windows Phone 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 साठी WhatsApp ने आपली सुविधा बंद केली होती. 31 डिसेंबर 2017 पासून या प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअॅप बंद आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *