AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2018 मधील टॉप-10 कार, गुगलची यादी प्रसिद्ध

मुंबई : गुगलने 2018 मध्ये टॉप ट्रेडिंग असलेल्या कारची यादी जाहीर केली आहे. यामध्ये वेग-वेगळ्या कंपनीच्या कारचा समावेश आहे. कोणती गाडी सर्वात जास्त सर्च करण्यात आली त्याची यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महिंद्रा, होंडा, मारुती, फोर्ड आणि बीएमड्ब्ल्यूचा यादीत समावेश आहे. भारतीयांना होंडा अमेजचा नवीन मॉडेल खूप आवडलेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सीवीटी गिअरबॉक्ससोबत […]

2018 मधील टॉप-10 कार, गुगलची यादी प्रसिद्ध
| Edited By: | Updated on: Feb 15, 2020 | 6:09 PM
Share

मुंबई : गुगलने 2018 मध्ये टॉप ट्रेडिंग असलेल्या कारची यादी जाहीर केली आहे. यामध्ये वेग-वेगळ्या कंपनीच्या कारचा समावेश आहे. कोणती गाडी सर्वात जास्त सर्च करण्यात आली त्याची यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महिंद्रा, होंडा, मारुती, फोर्ड आणि बीएमड्ब्ल्यूचा यादीत समावेश आहे.

भारतीयांना होंडा अमेजचा नवीन मॉडेल खूप आवडलेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सीवीटी गिअरबॉक्ससोबत डीझल कारची सुविधा देण्यात आली आहे. 5.87 लाख ते 9.11 लाखांमध्ये या गाडीची किंमत आहे.

गुगल ट्रेंडच्या दुसऱ्या नंबरवर महिंद्रा मराज्जो आहे. डबल विशबोन सेटअप आणि समोर असलेल्या आरामदायक केबीनची सुविधा दिल्यामुळे या गाडीने इनोव्हा आणि टोयोटाला मागे सोडले आहे. या गाडीची किंमत 9.99 लाख ते 13.90 लाख आहे.

टोयोटा यारिस भारतात एप्रिल 2018 मध्ये लाँच झाली. यामध्ये सहा एअरबॅग, प्रोजेक्टर हेड लॅम्प, पार्किंग सेंसरची सुविधा दिल्यामुळे लोकांच्या जास्त पसंतीस उतरली. तसेच यामध्ये सीवीटीचा विकल्पही दिला आहे. या गाडीची किंमत 9.29 लाख ते 14.7 लाख आहे.

ह्युंदाई सॅन्ट्रोही इंटरनेटवर हीट ठरली आहे. आपल्या जुन्या मॉडेलमुळे ह्युंदाई सॅन्ट्रोला जास्त प्रमाणात गुगलवर सर्च करण्यात आले. या गाडीची किंमत 3.90 ते 5.65 लाख आहे.

फिगो लाँच झाल्याच्या आठ वर्षानंतरही फोर्ड फ्री स्टाईलवर लोकांनी पसंती दिली आहे. या गाडीचे रिव्ह्यू चांगले असल्यामुळे गाडीची इंटरनेटवर लोकप्रियता चांगली राहिली. फिगोची किंमत 5.23 ते 7.93 लाख आहे.

मारुती सुझूकी अर्टीगाने लाँच झाल्यानंतर इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. मात्र जेवढ्या लवकर लोकप्रिय झाली तेवढ्या लवकर गाडी गायब झाली. यामध्ये पावरफुल डिझलच्या कमतरतेमुळे लोक निराश झाले. पण या वर्षात जास्त सर्चिंगमध्ये अर्टिगा सहाव्या क्रमांकावर आहे.

पेट्रोल इंजिन असलेली जीप रॅंगलर लाँच झाली तेव्हा गाडीची किंमत 56 लाखांपासून सुरु होती. विशेष म्हणजे इंटरनेटवर ही गाडी लाँच होताच लोकांनी बुकिंगला सुरुवात केली होती. लवकरच या गाडीचा नवा मॉडेल येणार आहे.

2018 ऑटो एक्सपोमध्ये लाँच झालेली BMW ची जीटी केवळ पेट्रोल व्हेरिएंट आहे. या गाडीची किंमत 61.8 लाखांपासून सुरु होते. मात्र यानंतर डीझल व्हेरिएंटने लोकांना जास्त प्रभावित केले.

या आधी लाँच झालेली X3 जास्त लोकप्रिय झाली नाही. या गाडीमध्ये X5 पेक्षा 50 mm मोठा वीलबेस होता. तसेच एलईडी हेडलॅम्प, डिजीटल इंटूमेंट क्लस्टरची सुविधा देण्यात आली होती.

2018च्या एक्सपोमध्ये महिंद्राच्या या गाडीला लाँच केले होते. या गाडीच्या प्रसिद्धिचे कारण असं की, गाडीची किंमत 26.95 लाख ते 29.95 लाख आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.