2G, 3G, 4G या 5G… तुमच्या भागात टेलीकॉम कंपनीची कोणती सर्व्हीस, आता समजून घेणे सोपे, फ्रॉड यूआरएल होणार बंद
Telecom Regulatory Authority of India (TRAI) : टेलिकॉम कंपन्या 1 ऑक्टोंबरपासून केवळ सुरक्षित असलेल्या यूआरएल किंवा ओटीपीच पाठवू शकणार आहेत. तसेच 140 सीरीजने सुरु होणारे सर्व टेलीमार्केटींग कॉल डिजिटल लेझर प्लॅटफॉर्मवर स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे त्याच्यांवर देखरेख करणे सोपे होणार आहे.
मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात नाही तर प्रत्येकाच्या घरात आला आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा टेलिकॉम कंपन्यांनी सुरु केली आहे. तसेच काही भागांतमध्ये अजूनही 2G सेवा सुरु आहे. आपल्या भागात 2G, 3G, 4G किंवा 5G कोणती सेवा आहे, त्याची माहिती ग्राहकांना मिळत नाही. परंतु आता 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार आहे. ग्राहकांना 2G, 3G, 4G किंवा 5G कोणती सेवा दिली जात आहे, त्याची माहिती मिळणार आहे. नवीन नियमांनुसार, सर्व टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती देणे अनिवार्य केले आहे.
वेबसाइटवर देणार माहिती
टेलिकॉम कंपन्या एखाद्या शहरात 5G सेवा देतात. परंतु काही ठिकाणी फक्त 2G सेवा प्रदान करते. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्या त्यांच्या सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित अनेक पॅरामीटर्सची माहिती त्यांच्या वेबसाइटवर देतील. आतापर्यंत ही माहिती टेलिकॉम कंपन्यांकडून सार्वजनिकरित्या दिली जात नव्हती.
1 ऑक्टोंबरपासून हे बदल
टेलिकॉम कंपन्या 1 ऑक्टोंबरपासून केवळ सुरक्षित असलेल्या यूआरएल किंवा ओटीपीच पाठवू शकणार आहेत. तसेच 140 सीरीजने सुरु होणारे सर्व टेलीमार्केटींग कॉल डिजिटल लेझर प्लॅटफॉर्मवर स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे त्याच्यांवर देखरेख करणे सोपे होणार आहे. नवीन ग्राहकांसाठी हे नियम फायदेशीर असणार आहे. त्यामुळे त्यांच्या भागात कोणती सेवा मिळत आहे, त्याची माहिती त्यांना सहज उपलब्ध होणार आहे. तसेच टेलिकॉम कंपन्यांना नेटवर्क सुधारावे लागणार आहे.
सर्व मोबाईल कंपन्यांना नियंत्रित करण्याचे काम ट्रायकडून केले जाते. आता ट्रायने सर्व कंपन्यांना ऑनलाईन सेवेत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार मोबाइल टेलीफोन सेवा नियम 2009, वायरलेस डेटा गुणवत्ता नियम 2012 आणि ब्रॉडबँड सेवा नियम 2006 एकाच ठिकाणी आणला गेला आहे. एक ऑक्टोंबरपासून हे सर्व बदल लागू करण्यात आले आहे.