देशात आजच्या दिवशी 29 वर्षांपूर्वी मोबाईलवरुन पहिला कॉल केला होता, कोणी आणि कोणाला कॉल केला ?

31 जुलै हा दूरसंचार क्षेत्रासाठी अतिशय खास दिवस आहे. याच दिवशी 29 वर्षांपूर्वी भारतात पहिला मोबाईल फोन कॉल करण्यात आला.कोणी केला होता. हा कॉल आणि कोणाला केला होता कॉल पाहूयात...

देशात आजच्या दिवशी 29 वर्षांपूर्वी मोबाईलवरुन पहिला कॉल केला होता, कोणी आणि कोणाला कॉल केला ?
first mobile call in india
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 31, 2024 | 4:05 PM

आजकाल स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण ज्याला पाहिजे त्याला कॉल करु शकतो. मोबाईलने जग खूपच जवळ आले होते. याआधी तर बीएसएनएल ( भारत संचार निगम ) लॅंडलाईन भारतात होत्या. आता आपल्याला फोन करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. तेव्हा जेव्हा नुकताच मोबाईल फोन भारतात आला होता. तेव्हा केवळ श्रीमंतांकडे मोबाईल फोन उपलब्ध होते. तेव्हा तर इनकमिंगला देखील पैसे लागायचे. परंतू बरोबर 29 वर्षांपूर्वी बरोबर आजच्या दिवशी 31 जुलै रोजी आज मोबाईल स्मार्टफोन क्षेत्रात क्रांती झाली होती.

वास्तविक भारतात पहिला मोबाईल कॉल आजच्या दिवशी म्हणजे 31 जुलै 1995 रोजी पश्चिम बंगालचे तत्कालिन मुख्यमंत्री ज्योती बसु यांनी भारतातील पहिला मोबाईल कॉल केला होता. MTNL चा तो जमाना होता.  मुख्यमंत्री ज्योती बसु यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला कॉल आजच्या दिवशी केला होता आणि भारतीय उपखंडात इतिहास घडला होता. भारतातील पहिला मोबाईल कॉल नोकीया कंपनीच्या हँडसेटवरुन केला होता. भारतच्या बीके मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या Telstra या कंपन्यांच्या जॉईंट वेंचरची ही किमया होती. या व्हॉयस कॉलला दोन लोकेशन कोलकाता आणि नवी दिल्लीवरुन केला होता. त्यावेळी कॉलची कॉस्ट खूपच जादा होती. एका वृत्तानूसार प्रति मिनिट 8.4 रुपये खर्च करावा लागला होता. त्यावेळी इनकमिंग आणि आऊटगोईंग अशा दोन्हीसाठी तेव्हा पैसा खर्च करावा लागत होता.

कोणत्या नेटवर्कवरुन झाला होता  कॉल

भारतात पहिला मोबाईल कॉल केल्याच्या घटनेला बरोबर 29 वर्षे पूर्ण झाले आहे. भारतातील पहिला मोबाईल कॉल MODI TELSTRA च्या मोबाईल नेटवर्क वरुन केला होता. या कॉलनंतर भारतात  मोबाईल फोनचे युग सुरु झाले. आज देशात जगातील सर्वाधिक मोबाईल फोन भारतात विकले जातात. भारत ही सर्वात मोठी मोबाईल बाजारपेट आहे. तसेच भारतात सर्वाधिक ऑनलाईन व्यवहार देखील भारतातच होतात.

Follow Us