AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लिपकार्टवर रेडमी 15A 5G ची विक्री सुरू, या 5G फोनला मिळेल 6 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट

भारतात रेडमी 15ए 5जी ची विक्री सुरू झाली आहे. हा फोन 6300 mAh बॅटरी, 32 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा आणि अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3.0 सह येतो. चला तर मग आजच्या लेखात आपण हा फोन तुम्हाला कोणत्या किंमतीत खरेदी करता येणार आहे ते जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवर रेडमी 15A 5G ची विक्री सुरू, या 5G फोनला मिळेल 6 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट
Redmi
| Edited By: | Updated on: Apr 05, 2026 | 8:31 AM
Share

Redmi 15A 5G भारतात फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. A सीरीजमधील हा नवीन फोन पॉवरफूल 6300 mAh बॅटरी आणि 32-मेगापिक्सलच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या डिव्हाइसवर तुम्हाला किती खर्च करावा लागेल आणि त्यात कोणते फिचर्स आहेत हे आजच्‍या लेखात जाणून घेऊयात.

या रेडमी स्मार्टफोन 4जीबी रॅम आणि 64जीबी व्हेरिएंटची किंमत 12 हजार 999 रूपये आहे. तर 4जीबी रॅम आणि 128जीबी व्हेरिएंटची किंमत 14 हजार 499 रूपये आणि 6जीबी रॅम आणि 128जीबी व्हेरिएंटची किंमत 16 हजार 499 रूपये आहे.

तसेच हा फोन एस ब्लॅक, अमेझ पर्पल आणि ऑसम ब्लू या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तर हा फोन फ्लिपकार्टवरून तसेच कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येतो. स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास याची स्पर्धा मोटोरोला जी67 पॉवर 5जी, रियलमी पी4 लाइट 5जी आणि सॅमसंग गॅलेक्सी एफ36 5जी यांसारख्या मॉडेल्सशी आहे.

रेडमी 15A 5G चे फिचर्स

ओएस: हा ड्युअल-सिम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3.0 वर चालतो. या डिव्हाइसला चार वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट्स आणि सहा वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स मिळतील.

स्क्रीन: या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 800 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेससह 6.9-इंचाचा HD+ रिझोल्यूशन स्क्रीन आहे.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी युनिसॉक टी8300 5जी ऑक्टा-कोअर चिपसेट.

कॅमेरा: या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून, त्यात 32-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये: सुरक्षेसाठी फोनमध्ये बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. तसेच, उत्कृष्ट आवाजासाठी यात स्टिरिओ स्पीकर्ससुद्धा आहेत.

बॅटरी: या फोनमध्ये पॉवरफूल 6300mAh बॅटरी आहे, जी 15W वायर्ड आणि 7.5W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.