Special Story | आठवडाभरात देशात 5G सह 4 बजेट स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या काय आहे खास?

नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात Lava, Tecno, Nokia आणि Poco सारखे फोन लॉन्च झाले आहेत. यामध्ये Lava ने आपला पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Special Story | आठवडाभरात देशात 5G सह 4 बजेट स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या काय आहे खास?
Nokia X100 5G - Poco M4 Pro 5G
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 7:00 AM

मुंबई : भारतीय मोबाइल बाजारात अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत, जे अनेक चांगल्या फीचर्ससह आणि स्पर्धात्मक किंमतींच्या सेगमेंटमध्ये लॉन्च होत आहेत. गेल्या आठवडाभरात भारतात अनेक चांगले मोबाईल लॉन्च झाले आहेत. यामध्ये परवडणाऱ्या 5G फोनसह अनेक चांगले पर्याय आहेत. तसेच, त्यापैकी दोन फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आले आहेत. (4 affordable smartphones with 5G connectivity were launched Within a week, know details)

नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात Lava, Tecno, Nokia आणि Poco सारखे फोन लॉन्च झाले आहेत. यामध्ये Lava ने आपला पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या नव्या स्मार्टफोन्सबद्दल.

Nokia X100 5G

नोकियाने परवडणारा 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकियाच्या या फोनचे नाव Nokia X100 आहे. हा स्मार्टफोन Nokia X सीरीज Nokia X20, Nokia X10 आणि Nokia XR20 चा भाग आहे, पण या स्मार्टफोनची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे. Nokia X100 मोबाईल फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च झाला आहे. कंपनीने हा फोन नुकताच यूएस मार्केटमध्ये सादर केला असला तरी इतर देशांमध्ये कधी लॉन्च केला जाईल याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Nokia X100 चे डिझाईन आणि प्रोसेसर नोकिया G300 सारखेच आहे, हा फोन नुकताच HMD Global ने सादर केला होते. या लेटेस्ट नोकिया फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर आहे, जो मिड रेंज 5G स्मार्टफोनसाठी एक शक्तिशाली चिपसेट आहे. हा फोन कंपनीचा एंट्री लेव्हल मोबाईल आहे. Nokia X100 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. आवश्यक असल्यास वापरकर्ते एक्स्टर्नल मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकतात.

Poco M4 Pro 5G

Poco M4 Pro 5G जागतिक स्तरावर लॉन्च झाला आहे. हा मोबाईल फोन Poco M3 Pro 5G चा अपग्रेड व्हर्जन आहे, जो या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आला होता. Poco M4 Pro 5G च्या मुख्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात मीडियाटेक डायमेंशन 810 चिपसेट आणि बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. Poco M4 Pro 5G ची किंमत 229 युरो (जवळपास 19,648 रुपये) आहे, ज्यात 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. त्याच वेळी, युजर्सना 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसाठी 249 युरो (21,364 रुपये) खर्च करावे लागतील. हा स्मार्टफोन पॉवर ब्लॅक, कूल ब्लू आणि पोको यलो कलरमध्ये आला आहे.

या Poco स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90hz आहे. तसेच, या फोनला 240hz चा टच सॅम्पलिंग रेट मिळेल. या फोनमध्ये MediaTek Dimension 810 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याला Mali G57 MC2 GPU देण्यात आला आहे. तसेच, यात 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते. या स्मार्टफोनमध्ये 1 TB पर्यंतचे SD कार्ड इन्सर्ट करता येईल. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 12.5 कस्टम स्किनवर काम करेल.

Lava Agni 5G

भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava ने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. Lava Agni 5G असे या मोबाईलचे नाव आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये लेटेस्ट 5G टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये MediaTek डायमेंशन प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 64 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. Lava Agni 5G ची किंमत 19,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे, परंतु कंपनीकडून या फोनवर विशेष सवलत दिली जाईल, त्यानंतर या फोनची किंमत 17,999 रुपये असेल. हा स्मार्टफोन लावाच्या अधिकृत वेबसाइट Lava वरून प्री-बुक करता येईल.

Lava Agni 5G मध्ये 2.5D कर्व्ह ग्लाससह 6.78-इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 1080×2460 रिझोल्युशनसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कंपनीने या मोबाईलमध्ये MediaTek Dimension 810 चिपसेट दिला आहे. तसेच, यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे. हा फोन Android 11 आऊट ऑफ द बॉक्स वर काम करतो. Lava Agni 5G च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे. यात 5 मेगापिक्सल्सचा सेकेंडरी कॅमेरा आहे, जी एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. यासोबतच इतर दोन 2-2 मेगापिक्सलचे कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे

Tecno Spark 8

Tecno ने भारतीय मोबाईल बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचे नाव Tecno Spark 8 आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन सप्टेंबरमध्ये लॉन्च केला होता, परंतु नवीन व्हेरिएंटमध्ये जुन्या व्हर्जनच्या तुलनेत नवीन प्रोसेसर आणि वेगळे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. Tecno Spark 8 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 9,299 रुपये आहे, ज्यामध्ये 3 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच हा फोन किरकोळ दुकानातून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन Atlantic Blue, Iris Purple आणि Turquoise Cyan कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. तर Tecno Spark 8 चे 2 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

ecno Spark 8 ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि तो Android 11 आधारित HiOS v7.6 वर काम करतो. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये 480 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. या Tecno स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे, तर MediaTek Helio A25 चिपसेट वेरिएंटमध्ये 2 GB रॅमसह वापरण्यात आला आहे. Tecno च्या लेटेस्ट फोनमध्ये 3GB LPDDR4x रॅम आहे. यामध्ये गेमिंगसाठी हायपर इंजिन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा टेक्नोचा दावा आहे.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(4 affordable smartphones with 5G connectivity were launched Within a week, know details)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....