Google ने प्ले स्टोअरवरुन हटविले हे 43 मोबाईल अ‍ॅप, तुमच्या मोबाईलमध्ये असतील लागलीच डीलीट करा

McAfee ने आपला अहवाल जारी करीत या 43 धोकादायक अ‍ॅप्सची माहीती दिली आहे. बॅंकींग फ्रॉड आणि तुमची माहीती चोरण्यासाठी या अ‍ॅप्सचा वापर व्हायचा अशी माहीती उघडकीस आली आहे.

Google ने प्ले स्टोअरवरुन हटविले हे 43 मोबाईल अ‍ॅप, तुमच्या मोबाईलमध्ये असतील लागलीच डीलीट करा
android-malware
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 10, 2023 | 7:02 PM

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून मोबाईलसाठी धोकादायक ठरु शकणारे मोबाईल अ‍ॅप हटविले आहेत. असे एकून 43 मोबाईल अ‍ॅप हटविण्यात आले आहेत ज्यात मालवेअर किंवा व्हायरस असण्याचा धोका आहे. महत्वाचे म्हणजे या अ‍ॅप्सना एकूण 2.5 दशलक्ष वेळा डाऊन लोड करण्यात आले आहे. या अ‍ॅप्सवर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचा उल्लंघन केल्याचा देखील आरोप आहे. हे अ‍ॅप मोबाईलचा डाटा खात होते. स्क्रिन बंद असल्यावर देखील ते कार्यरत रहात होते.

McAfee ने आपला अहवाल जारी करीत या 43 धोकादायक अ‍ॅप्सची माहीती दिली आहे. या अहवालात म्हटले आहे की या अ‍ॅपमुळे स्क्रीन बंद केल्यावर देखील फोनवर जाहीराती सुरु राहिल्याने मोबाईलची बॅटरी संपते. त्यामुळे युजरना मनस्ताप भोगावा लागत असायचा आणि त्यात डाटा लीक होण्याचा धोका जादा होता.ज्या 43 अ‍ॅपना गुगलने प्लेस्टोअरमधून हटविले आहे त्यात TV/ DMB प्लेअर, म्युझिक डाऊनलोडर आणि न्यूज एंड कॅलेंडर अ‍ॅप सामील आहेत. यातील अनेक एप्स मिडीया स्ट्रीमिंग आहेत. या अ‍ॅपवर फ्रॉड व्यवहारात सामील होण्याचा आरोप आहे.

या अ‍ॅपचा वापर करुन युजरच्या मोबाईल फोनला दूरवरुनही नियंत्रित केले जाऊ शकते. या अ‍ॅपद्वारे लोकांच्या मोबाईल फोनमध्ये शिरकाव करीत त्यांचे मॅसेज वाचणे, त्यांचा स्टोअरेज पाहण्याची क्षमता होती. हे एप्स युजरना दुसऱ्या अ‍ॅपच्या आधी नोटीफिकेशन दाखविण्यासाठी देखील रिक्वेस्ट करायचे. या अ‍ॅपचा वापर बॅंकींग फ्रॉडसाठी देखील होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

बचावासाठी काय करावे ?

– जर तुम्हाला वाटतेय की तुमचा फोनची स्क्रीन कोणत्या विशिष्ट अ‍ॅपमुळे वारंवार ऑन होत आहे. तर सेटींग तपासावी. जर शक्य झाले तर ते अ‍ॅप डीलीट करावे. त्याशिवाय बॅकग्राऊंड अ‍ॅप रिफ्रेशलाही बंद करावे. यामुळे स्क्रीन बंद केल्यावर कोणतेही अ‍ॅप बॅकग्राऊंडला चालू रहाणार नाही. त्यामुळे फोनच्या बॅटरीचे आयुष्य वाढेल, या शिवाय कोणत्याही अ‍ॅपला डाऊनलोड करण्यापूर्वी गुगल प्ले स्टोअरवर त्याचा रिव्ह्यू नक्की वाचवा.