iQOO चे स्वस्त TWS इअरबड्स भारतात लाँच, 50 तासांची बॅटरी आणि ‘हे’ भन्नाट फीचर्स
iQOO ने भारतात त्यांचा नवीन 5G फोन, iQOO Z11 लाँच केला आहे, ज्यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7500 टर्बो चिपसेट, 144Hz डिस्प्ले आणि उत्तम 7050mAh बॅटरी आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स व उपलब्धता याबद्दल जाणून घेऊयात.

iQOO ने कंपनीच्या नवीन iQOO Z11 स्मार्टफोन सोबत iQOO बड्स भारतात लाँच केले आहेत. हे ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इअरबड्स कंपनीचा नवीन बजेट पर्याय म्हणून आले आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विक्रीसाठी तयार असलेले iQOO बड्स एकाच रंगाच्या पर्यायात सादर करण्यात आले आहेत.
हे इअरबड्स 10mm मूव्हिंग कॉइल ड्रायव्हर्सने सुसज्ज आहेत. याशिवाय ते ड्युअल मायक्रोफोन सेटअप आणि AI कॉल नॉईज रिडक्शनला सपोर्ट करतात. कंपनीचा दावा आहे की त्यांच्या पेबल-आकाराच्या चार्जिंग केससह हे TWS एकूण 50 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतील. इन-इअर डिझाइन असलेले हे बड्स सिलिकॉन टिप्ससह येतात. चला तर मग या इअर बड्सची किंमत उपलब्धता जाणून घेऊयात.
iQOO बड्सची भारतातील किंमत आणि उपलब्धता
भारतात iQOO बड्सची किंमत 1 हजार 899 रूपये आहे. मात्र कंपनी ‘सर्व बँक कार्ड्सवर 200 रूपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देत आहे, ज्यामुळे प्रभावी किंमत 1 हजार 699 रूपांपर्यंत कमी होते. iQOO चे हे नवीन इअरबड्स भारतात 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होतील. iQOO बड्स ‘फ्लेम यलो’ या एकाच रंगात उपलब्ध आहेत.
iQOO Buds चे फीचर्स
iQOO Buds हे 10mm मूव्हिंग कॉइल ड्रायव्हर्स असलेले इन-इअर इअरबड्स आहेत. यामध्ये AAC आणि SBC कोडेक्स, तसेच DeepX 4.0 साउंड इफेक्ट्स आणि स्पॅशियल ऑडिओचा सपोर्ट मिळतो. हे इअरबड्स 20Hz ते 20,000Hz फ्रिक्वेन्सी रेंज देतात.
कॉलिंगचा अनुभव चांगला मिळावा यासाठी यात ड्युअल मायक्रोफोन आणि AI Call Noise Reduction देण्यात आले आहे. त्यामुळे आजूबाजूचा अनावश्यक आवाज कमी करून कॉलिंग अधिक स्पष्ट करण्यास मदत होते.
कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 6.1 आणि Dual-Channel Transmission 2.0 मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मोकळ्या जागेत याची रेंज 10 मीटरपर्यंत आहे. गेमिंगसाठी यात 42ms लो लेटन्सी मिळते. धूळ आणि पाण्याच्या शिडकाव्यापासून संरक्षणासाठी हे IP54 रेटेड आहेत.
याशिवाय, Android फोनसोबत क्विक पेअरिंग करता येते. डबल-टॅप, ट्रिपल-टॅप आणि टच-अँड-होल्ड अशा टच कंट्रोल्सच्या मदतीने म्युझिक आणि इतर फंक्शन्स सहज कंट्रोल करता येतात.
50 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप
बॅटरीच्या बाबतीतही iQOO Buds चांगले आहेत. प्रत्येक इअरबडमध्ये 53mAh बॅटरी, तर चार्जिंग केसमध्ये 525mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, चार्जिंग केससह 50 तासांपर्यंत प्लेबॅक मिळतो, तर केवळ इअरबड्स 12 तासांपर्यंत चालू शकतात.
इअरबड्स पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 1 तास, तर चार्जिंग केसला सुमारे 2 तास लागतात. विशेष म्हणजे फक्त 10 मिनिटे चार्ज केल्यावर 4 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक मिळू शकतो. चार्जिंग केसचे माप 63 × 47.76 × 28.06mm असून, त्याचे वजन अंदाजे 41.3 ग्रॅम आहे.
