AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : Jio ने दाखवली 6G ची झलक, 5G पेक्षा जास्त 5 पट स्पीड, कधी होणार सुरुवात?

Jio ने IMC 2026 मध्ये Pre-6G Technology Stack आणि Giga MIMO Radio सादर केले. 5G नंतर आता ग्राहकांना लवकरच 6G वापरता येणार आहे. मात्र ग्राहकांना प्रत्यक्ष 6G सेवा वापरता येण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Jio : Jio ने दाखवली 6G ची झलक, 5G पेक्षा जास्त 5 पट स्पीड, कधी होणार सुरुवात?
JIO 6G NEWSImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 10, 2026 | 2:08 PM
Share

भारतामध्ये अजूनही 5G नेटवर्कचा विस्तार हळूहळू होतोय. त्यातच आता Jio ने 6G ची तयारी देखील सुरू केली आहे. पुढील पीढीच्या वाढत्या तंत्रज्ञानाचा विचार करता Jio ने 6G क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या नव्या तंत्रज्ञानाची झलकही दाखवण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC)मध्ये 2026 मध्ये कंपनीने आपले Pre-6G Technology Stack आणि Giga MIMO Radio सादर केले आहे. या नव्या 6G च्या तंत्रज्ञानात इंटरनेटचा स्पीड 5 पट जास्त करणे तसेच MSG किंवा इतर वापरासाठी लागणार वेळ 10 पट कमी करण्याचे Jio चे ध्येय आहे.

6G मुळे नेमका काय फायदा होणार

Jio च्या मते, 6G नेटवर्कमध्ये सध्याच्या 5G च्या तुलनेत 5 पट जास्त नेटवर्क क्षमता मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर लेटन्सी जवळपास दहापट कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लेटन्सी म्हणजे एखादी विनंती पाठवल्यानंतर नेटवर्ककडून प्रतिसाद मिळेपर्यंत लागणार वेळ. हा वेळ कमी झाल्यास रिअल टाईम AI सेवा, दूरस्थ आरोग्यसेवा, डिजीटल शिक्षण आणि होलोग्राफिक संवाद यांसारख्या तंत्रज्ञानाला फायदा होऊ शकतो. मात्र याचा वापर प्रत्यक्षात करण्यासाठी योग्य उपतकरणे आणि सॉफ्टवेअरही आवश्यक असतील.

6G सेवा भारतात कधी सुरू होणार?

Jio च्या मते 6G तंत्रज्ञानाचे जागतिक मानक 2030 पर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे. भारतातही सुरूवातीच्या टप्प्यात 6G सेवा सुरू करणाऱ्या देशांमध्ये सहभागी होण्याची तयारी केली जात आहे. मात्र Jio ने व्यावसायिक सेवा सुरू करण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. io च्या माहितीनुसार कंपनीने आपल्या तंत्रजानाशी संबंधित 8000 हून अधिक पेटंट दाखल केले आहेत. त्यापैकी शेकडो पेटंट 6G तंत्रज्ञानावर संबंधित आहेत. कंपनी AI आधारित नेटवर्क आणि व्काटंम कॉम्युटिंगमुळे निर्माण होणाऱ्या सायबर सुरक्षा यांच्यावरही काम करत आहे.

काय आहे Giga MIMO Radio?

IMC 2026 मध्ये Jio ने Giga MIMO Radio तंत्रज्ञान सादर केले. MIMO म्हणजे Multiple Input Account Output. या तंत्रज्ञानामध्ये अनेक अँटिनांचा वापर करून वायरलेस नेटवर्कवर डेटा पाठवण्याची आणि स्वीकारण्याची क्षमता वाढवली जाणार आहे. त्यामुळे नेटवर्कची क्षमता आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. शिवाय Jio ने अशी कॉमन बेसबँड युनिटही दाखवली, जी 5G आणि 6G या दोन्ही नेटवर्कसाठी वापरता येईल. त्यामुळे भविष्यात नेटवर्कचे तंत्रज्ञान अपग्रेड करणे सोपे होऊ शकते.

थोडक्यात काय तर Jio ने IMC मध्ये 6G तंत्रज्ञानाच्या दिशेने सुरू केलेल्या कामाची झलक दाखवली आहे. मात्र सध्या हे तंत्रज्ञान तयारी आणि विकासाच्या टप्प्यात असून 6G सेवा ग्राहकांना नेमक्या केव्हा वापरता येतील,याबाबत अद्याप तारीख जाहीर झालेली नाही.

Follow Us
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल