8GB, 12GB की 16GB कोणत्या रॅममुळे तुमचा फोन चालेल सुपरफास्ट? जाणून घ्या सविस्तर
8GB, 12GB की 16GB कोणती रॅम तुमच्या फोनसाठी बेस्ट आहे. कोणत्या रॅममुळे तुमचा फोन सुपरफास्ट चालेल जाणून घ्या.

नवा फोन घेताना कॅमेरा किती मेगापिक्सेलचा, प्रोसेसर किती दमदार आणि बॅटरी आणि किती mAh याबाबत हजार प्रश्न आपल्याला पडलेले असतातच. या सर्व गोष्टीचा विचार करूनच आपण फोन खरेदी करत असतो पण त्यात आता रॅमही तपासणे महत्त्वाचे आहे. बाजारात 8GB, 12GB की 16GB रॅमचे मोबाईल उपलब्ध असतात. त्याप्रमाणे त्याच्या किमतीही ठरलेल्या असतात. प्रत्येकाला 16GB रॅमची गरजच असते का की 8GB तुम्हाला पुरेशी आहे? जाणून घ्या सोप्या भाषेत.
RAM फोनची मेमरी
फोनमध्ये एकाच वेळी अनेक अॅप्स सुरू असतील तर त्यांचा डेटा तात्पुरता RAM मध्ये राहतो. म्हणजेच उदा. तुम्ही क्रोमवर काहीतरी पाहत आहात, मध्येच WHATSAPP उघडलं आणि त्यानंतर पुन्हा CHROMRवर गेलात तर RAM मुळे पुन्हा त्याच ठिकाणाहून सुरू होण्याची शक्यता असते. पण जर RAM कमी असेल तर बॅकग्राउंडमधील अॅप्स बंद होतात. रिलोड करताना अनेक अडचणी येतात.
8GB RAM रोजच्या कामासाठी पुरेशी
WhatsApp, Instagram, Youtube, Chrome ऑनलाईन शॉपिंग, बँकिंग आणि कॅमेरा एवढच काम फोनवर असेल तर 8GB RAM तुम्हाला पुरेशी आहे. फक्त RAM जास्त आहे म्हणून फोन आपोआप सुपरफास्ट होईल अस नाही. प्रोसेसर, स्टोरेजची स्पीड आणि फोनचं सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन यांचाही फोनच्या परफॉर्मन्सवर मोठा परिणाम होतो.
12 GB RAM गेमिंग आणि मल्टिटास्कींगसाठी
जे यूजर्स सारखे अॅप्स स्विच करत असतात. फोनमध्ये मोठे गेम किंवा एडिटिंग करत असाल तर त्याच्यांसाठी 12 GB RAM उत्तम आहे. जास्त RAM मुळे स्पीड देखील चांगला मिळतो.
168 GB RAM
जास्त करून या RAM चा वापर सहसा कोणाला पडत नाही. पण मल्टिटास्किंग, हेवी गेमिंग आणि मेमोरी- इंटेंसिव काम करण्यासाठी इतके RAM उत्तम आहे.
फोन घेताना नीट तपासून घ्या
फोनच्या बॉक्सवर मोठ्या अक्षरात लिहिलेल्या RAM च्या आकड्यांवर विश्वास ठेवू नका. फोन घेताना RAM, प्रोसेसर, स्टोरेज स्पीड, सॉफ्टवेअर अपडेट्स याकडेही लक्ष द्या.
