एसी कंप्रेसरचा स्फोट होऊ नये यासाठी तुम्ही ‘ही’ या चुका टाळा, अन्यथा…

तुम्ही जर एसीचा वापर जास्‍त करत असाल तर एसीच्या कंप्रेसरची देखभाल वेळीच करा. जर तुम्ही वेळीच देखभाल केली नाही तर कंप्रेसरचा स्फोट होण्याची शक्यता असते. अशातच तुमच्या जीवला धोका निर्माण होऊ शकतो. एसीच्या कंप्रेसरमध्ये स्फोट झाल्याची बातमी येताच लोकांना एसीची भीती वाटू लागते. यासाठी एसी कंप्रेसरचा स्फोट होण्यापासुन आपण कसे रोखू शकतो ते आपण या लेखात जाणुन घेऊयात...

एसी कंप्रेसरचा स्फोट होऊ नये यासाठी तुम्ही ही या चुका टाळा, अन्यथा...
| Edited By: | Updated on: Jun 07, 2025 | 3:27 PM

तुम्ही अनेकदा एसी कॉम्प्रेसरचा स्फोट होण्याच्या घटना ऐकल्या असतील या वर्षीही वेगवेगळ्या राज्यांमधून एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. अलिकडेच पंजाबमधील रूपनगरमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले. तर अशा वेळेस एसी वापरताना काळजी घ्यावी, अन्यथा थोडीशी निष्काळजीपणा एसीमध्ये स्फोट होऊ शकतो. जर तुम्ही काही सवयी आणि तांत्रिक त्रुटींकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. कदाचित तुम्हाला जीवही गमवावा लागू शकतो.

अशातच आजकाल घरात जरा उकडू लागलं की काहीही विचार न करता एसी लावला जातो. आता एसीचा वापर फक्त उन्हाळ्यापुरता मर्यादित राहिला नसून, पावसाळ्यातही वापरला जातो. त्यामुळे एसीचा अतिवापर होत चालेला आहे. तर आज आम्ही तुम्हाला कंप्रेसरमध्ये स्फोट होण्याची कारणे आणि ते टाळण्याचे काही मार्ग सांगणार आहोत, जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा एसी कोणत्याही समस्येशिवाय चालू राहील आणि स्फोट होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात…

एसी कॉम्प्रेसरचा स्फोट का होतो?

मेंटेनेंस: जर तुम्ही एसीची सर्व्हिसिंग करण्यास निष्काळजीपणा केलात तर कंप्रेसरमध्ये घाण, धूळ साचल्यामुळे कंप्रेसरवरील दाब वाढू शकतो, ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो.

सतत एसी चालू ठेवणे: जर तुम्ही 15 तासांपेक्षा जास्त काळ एसी न थांबता लावून ठेवत असाल तर तुमचा हा निष्काळजीपणा खूप महागात पडू शकतो. सतत एसी चालवल्याने कंप्रेसर जास्त गरम होऊ शकतो, ज्यामुळे आग किंवा कंप्रेसर स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो.

स्टॅबिलायझरशिवाय एसी चालवणे: काही लोक स्टॅबिलायझरशिवाय एसी चालवतात, ज्यामुळे व्होल्टेजमधील चढउतार कधीकधी कंप्रेसरवर परिणाम करतात, ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका वाढतो.

गॅस गळती: एसीमध्ये गॅस गळती होणे हे देखील कंप्रेसरमध्ये स्फोट होण्याचे एक मोठे कारण असू शकते, म्हणून वेळेवर सर्व्हिसिंग करा जेणेकरून एसीमध्ये गॅस गळतीची समस्या आहे की नाही हे कळेल.

एसीचा स्फोट होऊ नये यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

मेंटनेंस: विंडो एसी असो किंवा स्प्लिट एसी, जर तुम्ही तुमचा एसी नियमितपणे सर्व्हिसिंग केला तर तुमचा एसी वर्षानुवर्षे कोणत्याही समस्येशिवाय चालेल.

स्टॅबिलायझर: उन्हाळ्यात व्होल्टेजची समस्या अनेकदा उद्भवते, ज्याचा एसीच्या भागांवर परिणाम होतो. म्हणून एसीसोबत स्टॅबिलायझर बसवणे नेहमीच उचित असते.