पावसाळ्यात AC वापरताना ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

पावसाळ्यात एसी वापरताना काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, जर तुम्ही थोडासा समजूतदारपणा दाखवला तर तुम्ही एसी खराब होण्यापासून वाचवू शकता. पावसाळ्यात एसीचा वापर करताना केलेली एक छोटीशी चूक देखील तुमचे मोठे नुकसान करू शकते. चला तर मग कोणत्या गोष्टी लक्षात ठेऊन पावसाळ्यात एसीचा वापर करावा.

पावसाळ्यात AC वापरताना या 3 गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान
Rain ac Tips
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jul 11, 2025 | 2:46 AM

पावसाळा सुरू होताच आपल्याला उष्णतेपासून थोडा आराम मिळतो, परंतु कधीकधी हवामानातील आर्द्रतेमुळे आपल्याला गरम होते. कारण या हंगामात हवेत आर्द्रता खूप वाढलेली असते, ज्यामुळे घाम जास्त येतो आणि त्वचा चिकट वाटते. अशातच एसी केवळ हवा थंड करत नाही तर ती कोरडीही करते म्हणजेच हवेतून आर्द्रता शोषून घेतात, यासाइी आपण घरात एसी चालू करतो. जर तुम्ही पावसाळ्यात एसी वापरत असाल तर प्रथम तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असायला हव्यात, कारण तुम्ही एसीचा योग्य वापर केला नाही तर तुमचा एसी खराब होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात.

पावसाळ्यात एसी वापरताना या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे, कारण थोडीशी समजूतदारपणा दाखवल्यास तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण पावसाळ्यात एसीचा वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

या गोष्टी लक्षात ठेवा

पहिली महत्त्वाची गोष्ट: पावसाळ्या सुरू झाला की अनेक भागांमध्ये वीजेचे व्होल्टेज फ्लक्चुएशन म्हणजेच वर-खाली ची समस्या सुरू होते, ज्यामुळे एसीचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हीही पावसाळ्यात एसी वापरत असाल, तर व्होल्टेज फ्लक्चुएशन समस्येपासून एसीचे संरक्षण करण्यासाठी स्टॅबिलायझर नक्कीच बसवा.

स्टॅबिलायझर फक्त पावसाळ्यातच नाही तर नेहमीच बसवावे, कारण व्होल्टेजची समस्या फक्त पावसाळ्यातच उद्भवते असे नाही, अनेक राज्यांमध्ये, घरांमध्ये वाढत्या वीजेच्या वापरामुळे उन्हाळ्यातही व्होल्टेजची समस्या उद्भवते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट: जर तुम्ही पावसाळ्यात एसी वापरत असाल तर तुम्ही फक्त इनडोअर युनिटचीच नाही तर आउटडोअर युनिटचीही काळजी घेतली पाहिजे. जर तुमच्या एसीचा आउटडोअर युनिट अशा ठिकाणी असेल जिथे पावसाचे पाणी थेट जाऊ शकते, तर पावसाचे पाणी आउटडोअर युनिटमध्ये जाऊ नये आणि इलेक्ट्रिकल पार्ट्सचे नुकसान होऊ नये यासाठी तेथे शेड लावा.

तिसरी महत्त्वाची गोष्ट: पावसाळ्यात जर तुमच्या परिसरात वारंवार वीज खंडित होत असेल, तर एसी बंद करा, कारण वीज येण्या-जाण्यामुळे एसीच्या पार्ट्सना वीजेचा झटका जोरात बसू शकतो ज्यामुळे एसीचे पार्ट खराब होऊ शकतात.