AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणचा संयम सुटला, आता आर या पारची तयारी, अमेरिकेला हादरवणारी धमकी, जगभरात चिंता वाढली

अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. दोन दिवसांमध्ये दोन मोठे नेते इराणने गमावले आहेत. त्यामुळे आता इराणकडून अमेरिकेला खळबळ उडवून देणारी धमकी देण्यात आली आहे.

मोठी बातमी! इराणचा संयम सुटला, आता आर या पारची तयारी, अमेरिकेला हादरवणारी धमकी, जगभरात चिंता वाढली
Mojtaba KhameneiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 18, 2026 | 6:47 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 19 वा दिवस आहे. या 19 दिवसांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि या भीषण युद्धाला सुरुवात झाली. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, त्यानंतर इस्त्रायलने इराणला अशी देखील धमकी दिली होती की, जर इराणने पुन्हा नव्या सर्वोच्च नेत्याची निवड केली तर आम्ही त्याला देखील मारू, दरम्यान त्यानंतर इराणकडून सर्वोच्च नेता म्हणून मोजतबा खामेनेई यांची निवड करण्यात आली. मोजतबा खामेनेई हे देखील या युद्धात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान त्यानंतर इस्त्रायलकडून मंगळवारी इारणवर पुन्हा एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यामध्ये  इराणचे वरिष्ठ संरक्षण अधिकारी अली लारीजानी यांचा मृत्यू झाला. मोजतबा खामेनेई हे सध्या जखमी आहेत. आयतुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर या युद्धाची सर्व सुत्रे हे लारीजानी हेच सांभाळत होते. त्यामुळे लारीजानी यांचा मृत्यू हा इराणसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर बुधवारी इस्त्रायलकडून पुन्हा इराणवर हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये  इराणच्या तिसऱ्या प्रमुख नेत्याचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार या हल्ल्यात इराणचे मंत्री इस्माईल खतीब यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान एकापाठोपाठ होत असलेल्या आपल्या नेत्यांच्या मृत्यूमुळे आता इराण चांगलाच आक्रमक झाला आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला थेट धमकी देण्यात आली आहे. आता आम्ही अशा शस्त्रांचा वापर करू जे यापूर्वी आम्ही कधीच वापरलेलं नाहीये. आम्ही आमच्या संरक्षणासाठी तयार असून आमच्याकडे हायपसॉनिक मिसाईल आणि इतर अनेक अत्याधुनिक शस्त्र आहेत, ज्याचा वापर आम्ही आता युद्धात करणार आहोत, अशी धमकी इराणेचे राष्ट्रपती  मसूद पेजेशकियान यांनी अमेरिकेला दिली आहे.

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...