AI Impact Summit: गलगोटिया युनिव्हर्सिटीचा अखेर माफीनामा, स्वत:चा सांगून प्रदर्शित केलेल्या चीनी रोबोटची वैशिष्ट्ये आणि किंमत काय?

दिल्लीत AI Impact Summit मध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीने सादर केलेला डॉग रोबोट हा चीनचा असल्याने नंतर खळबळ उडाली. मात्र, आता युनिव्हर्सिटीने आम्ही तो आमचा असल्याचा दावा आम्ही केलाच नव्हता असे म्हटले आहे. नेमका हा रोबोट आहे कसा ते पाहूयात...

AI Impact Summit: गलगोटिया युनिव्हर्सिटीचा अखेर माफीनामा, स्वत:चा सांगून प्रदर्शित केलेल्या चीनी रोबोटची वैशिष्ट्ये आणि किंमत काय?
| Updated on: Feb 18, 2026 | 6:03 PM

दिल्लीत भरलेल्या AI Impact Summit 2026 मध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटी प्रचंड चर्चेत आली आहे. या युनिव्हर्सिटीने सादर केलेला एक रोबोट डॉग प्रत्यक्षात चीन असल्याचे उघड झाल्याने या युनिव्हर्सिटीच्या स्टॉल गाशा गुंडाळावा लागला आहे.या चार पायांचा कुत्र्यासारखा दिसणारा रोबोट तुम्ही अनेकदा समाजमाध्यमावर पाहिला असेल. हा डॉग रोबोट नेमका कसा आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय हे पाहूयात…

या डॉग रोबोटला दिल्लीत भरलेल्या AI Impact Summit 2026 मध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीने प्रदर्शनात मांडले. लोक याला पाहून स्टॉलजवळ थांबले आणि व्हिडीओ बनवून शेअर करु लागले. काही तासात हा रोबो इंटरनेटवर ट्रेंड करु लागला, नंतर कळले की हा रोबोट चीनची कंपनी Unitree Robotics ने तयार केलेला आहे. त्याचे नाव Unitree Go2 असे आहे.

Unitree Go2 रोबोट नेमके कसे ?

Unitree Go2 हा एक AI-पॉवर्ड रोबोट डॉग आहे.हा रोबोट आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेऊ शकतो आणि स्वत: कोणत्याही पृष्ठभागावर चालू शकतो. यास लावलेले कॅमेरे आणि सेंसर रस्त्याची ओळख करु शकतात आणि अडचणींवर मात करु शकतात.कंपनीच्या वेबसाईटवर Unitree Go2 रोबोटची किंमत १६०० डॉलर ते २८०० डॉलर पर्यंत सांगितली जात आहे. शिपिंगसह याची किंमत सुमारे ६ लाख रुपयांपर्यंत जाते.

LiDAR सेंसर्सने सुसज्ज रोबोट

हा रोबोट एकदम स्मुद पद्धतीने कोणत्याही जागी चालू शकतो. वळू शकतो, हलक्या उंचवट्यावरही चालू शकतो.यामुळे यास रिसर्च, सिक्युरिटी डेमो आणि टेक शोकेस सारख्या इव्हेंट्समध्ये वापरला जातो.या रोबोटमध्ये खास LiDAR सेंसर्स देण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या आकाराचा थ्री – डायमेन्शनल मॅप तो तयार करतो. यासोबत यात कॅमेरा आणि मोशन सेंसर देखील आहे. हा रिएल – टाईम डेटा प्रोसेस करु शकतो. काही व्हर्जनमध्ये यास रिमोट कंट्रोल आणि मोबाईल एपने ऑपरेट करता येते. रोबोट बॅटरीवर चालतो. ही बॅटरी काही तास चालतो.

Unitree Go2 रोबोटची किंमत याच्या मॉडेलवर निश्चित होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत दीड लाखापासून सुरु होते. जास्त फिचर्सवाल्या रोबोटची किंमत जास्त असते. त्यामुळे हा रोबोट सर्वसामान्यासाठी नाही, कॉलेज, लॅब, स्टार्टअप आणि रिसर्च टीमसाठी हे उत्पादन तयार केला आहे.

गलगोटियाचा माफीनामा

या रोबोट दिल्लीत समीटमध्ये सादर करण्यात आला. भारतातील लोकांना तो पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहाता आल्याने त्याची प्रचंड चर्चा झाली. भारतीय कोणत्याही चालत्या – फिरत्या मशीनला प्रथमच लाईव्ह पाहात होते. त्यामुळे त्याला पाहायला प्रचंड गर्दी झाली. अनेक विद्यार्थ्यांनी आणि व्हिजिटर्सने त्याच्या सोबत फोटो काढले. हा रोबोट चीनचा असल्याने देखील याला जास्त व्हायरल करण्यात आले. परंतू या समिटमध्ये आपल्या वस्तू दाखवणे अपेक्षित होते. त्यामुळे समिटमध्ये एखाद्या विदेशी प्रोडक्टला सादर करणे योग्य नाही. यामुळे या गलगोटिया यांच्या स्टॉलवर हा रोबोट सादर केल्यानंतर तो चीनचा असल्याने त्यावर टीका झाली. मात्र, विद्यापीठाने नंतर आमच्या प्रतिनिधीला त्या रोबोटच्या मालकी संदर्भात माहिती नव्हती असा खुलासा करत माफी मागितली आहे.