मुंबई : टेलीकॉम कंपन्यांनी आता रिचार्ज योजनांना बंडल प्लॅनमध्ये रूपांतरित केले आहे. म्हणजेच, आता या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ टेलिकॉम फायदेच नाहीत तर इतरही सुविधांचा लाभ घेता येणार आहे. अलीकडच्या काळात, कंपन्यांनी रिचार्जसह ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरही युजर्सना ॲक्सेस मिळवून देणे सोपे केले आहे. असाच एक स्वस्त प्लॅन एअरटेलने ऑफर (new plan) केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटासह (data) ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रवेश करता येईल. कंपनीची ही योजना अगदी सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहे. या लेखातून एअरटेलच्या नव्या योजनांबाबत माहिती घेऊ या.