AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर

M2M Connection Report : TRAI च्या जुलै 2026 मधील टेलिकॉम सब्सक्रिप्शन रिपोर्टनुसार, एअरटेल, रिओ आणि व्हिडाफोन आयडियाच्या या तिन्ही कंपन्यांच्या M2M कनेक्शनमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
jio Airtl and Vi M2M ConnectionImage Credit source: Google
| Updated on: Aug 30, 2026 | 5:57 PM
Share

भारतात इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आता केवळ स्मार्टफोनपुरता मर्यादित राहिलेला नाही. मशीन-टू-मशीन (M2M) कनेक्शन आणि IoT म्हणजेच इंटरनेट थिंग्सचा विस्तारही वेगाने होत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या जुलै 2026 मधील टेलिकॉम सब्सक्रिप्शन रिपोर्टनुसार, एअरटेल, रिओ आणि व्हिडाफोन आयडियाच्या या तिन्ही कंपन्यांच्या M2M कनेक्शनमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. मात्र यात कोणती कंपनी आघाडीवर आहे ते जाणून घेऊयात.

Jio ची स्थिती काय?

रिलायन्स जिओने M2M सेगमेंटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. रिपोर्टनुसार, जानेवारी 2026 मध्ये कंपनीकडे 20.60 मिलियन M2M कनेक्शन होते. हे प्रमाण जुलैपर्यंत वाढून 26.56 मिलियन झाले आहे. म्हणजेच, सहा महिन्यांच्या कालावधीत Jio ने तब्बल 5.96 मिलियन नवीन M2M कनेक्शन जोडले आहेत. केवळ जुलै महिन्याचा विचार केला तर कंपनीने 0.80 मिलियन नवीन M2M कनेक्शन जोडले. याच काळात कंपनीचा एकूण वायरलेस सब्सक्राइबर बेसही 491.49 मिलियनवरून वाढून 506.03 मिलियन झाला आहे.

Vi ला M2M कनेक्शनचा आधार

व्होडाफोन आयडियासाठीही M2M व्यवसायाची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. जुलै 2026 मधील आकडेवारीनुसार, कंपनीकडील M2M कनेक्शनची संख्या वाढून 21.92 मिलियन झाली आहे. जानेवारीच्या तुलनेत ही 3.11 मिलियन कनेक्शनची वाढ आहे. विशेष म्हणजे, Vi च्या ग्राहक सेगमेंटवर मात्र दबाव कायम असल्याचे दिसून येते. जुलैमध्ये कंपनीच्या कंझ्युमर SIM कनेक्शनमध्ये सुमारे 59 हजारांची घट झाली. त्यामुळे M2M सेगमेंटमधील वाढ कंपनीसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी ठरली आहे.

एअरटेलने मारली बाजी

M2M कनेक्शन वाढवण्याच्या बाबतीत एअरटेल या तिन्ही कंपन्यांमध्ये सर्वात पुढे राहिली आहे. जानेवारी 2026 मध्ये एअरटेलकडे 70.18 मिलियन M2M कनेक्शन होते. जुलैपर्यंत ही संख्या वाढून 84.45 मिलियन झाली. म्हणजेच, सुमारे सहा महिन्यांत कंपनीने तब्बल 14.27 मिलियन नवीन M2M कनेक्शन जोडले आहेत. ही जवळपास 20.3 टक्के वाढ आहे. त्यामुळे M2M सेगमेंटमध्ये एअरटेलने जिओ आणि व्ही आय या दोन्ही कंपन्यांना मागे टाकल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

M2M कनेक्शन म्हणजे नेमकं काय?

M2M म्हणजे मशीन टू मशीन. या तंत्रज्ञानाच्या मदतीने मशीन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे मानवी हस्तक्षेपाशिवाय एकमेकांशी डेटा शेअर करू शकतात. याचा वापर स्मार्ट मीटर, वाहन ट्रॅकिंग, औद्योगिक यंत्रसामग्री, सुरक्षा यंत्रणा आणि विविध IoT उपकरणांमध्ये केला जातो. M2M कनेक्शनची संख्या वाढत जाणे हे भारतात डिजिटल आणि कनेक्टेड उपकरणांचा वापर वेगाने वाढत असल्याचे संकेत मानले जातात.

Follow Us
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान
Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र.
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र अघोरी प्रकाराची चर्चा