जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनला एअरटेलची जोरदार टक्कर, किंमत आणि ऑफर …

| Updated on: Nov 16, 2019 | 9:53 AM

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांमध्ये (Airtel 169 Plan to compete jio) नेहमीच स्पर्धा पाहायला मिळते.

जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनला एअरटेलची जोरदार टक्कर, किंमत आणि ऑफर ...
Follow us on

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांमध्ये (Airtel 169 Plan to compete jio) नेहमीच स्पर्धा पाहायला मिळते. दोन्ही कंपन्या नेहमीच नवनव्या ऑफर देऊन एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच जिओ आणि एअरटेलचे अनेक प्रीपेड प्लॅन (Airtel 169 Plan to compete jio) जवळपास सारखे असल्याचे पाहायला मिळते. आताही तसंच होताना दिसत आहे.

जिओने आपल्या ग्राहकांना काही अतिरिक्त चार्जेस लावणे सुरु केले. त्यामुळे जिओ ग्राहकांना काहीसा आर्थिक भार पडला. मात्र, त्यातून दिलासा देण्यासाठी जिओने काही नवे “ऑल इन प्लॅन” लॉन्च केले. त्यानुसार 149 रुपयांच्या रिचार्जनंतर जिओ ग्राहकांना अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही. त्याला टक्कर देण्यासाठी एअरटेलने 169 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे.

जिओचा 149 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटाची ऑफर देण्यात आली आहे. या प्लॅनला 24 दिवसांची वैधता आहे. याप्रमाणे या प्लॅनमध्ये ग्राहकाला एकूण 36 जीबी डेटा मिळणार आहे. प्लॅनमध्ये जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळणार आहे. तर दूसऱ्या नेटवर्कवरील कॉलसाठी 300 मिनिट मिळणार आहे. सोबतच 100 फ्री एसएमएसचा फायदाही ग्राहकांना मिळणार आहे.

एअरटेलचा 169 रुपयांचा प्लॅन

जिओच्या तुलनेत एअरटेलच्या प्लॅनची किंमत आणि वैधता काहीशी अधिक आहे. एअरटेलच्या या प्लॅनची किंमत 169 रुपये असून वैधता 28 दिवसांची आहे. यात ग्राहकांना दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. वैधतेच्या तुलनेत एअरटेलने 4 दिवस अधिक दिले असले, तरी जिओच्या डेटाचा विचार करता एअरटेलच्या प्लॅनमध्ये दररोज 500MB डेली डेटा कमी मिळणार आहे. एअरटेलने या प्लॅनसोबत ग्राहकांना दररोज 100 एसएमएस आणि विंक म्यूझिक, एअरटेल Xstream अॅपचं सब्सक्रिप्शन पण दिलं आहे.