AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

श्रम मंत्रालयाने ईपीएफओ खातेधारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता नोकरी बदलल्याने निष्क्रीय ठरलेल्या पीएफ खात्यातील पैशांसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

EPFO: नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
EPFO
| Updated on: Feb 23, 2026 | 8:39 PM
Share

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO)च्या खातेधारकांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. श्रम मंत्रालयाने पीएफशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या नव्या योजनेनुसार बंद पडलेल्या खात्यांतील पैसा कोणत्याही कागदी कारवाई शिवाय थेट तुमच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होणार आहे.

कोणत्या खात्यात पोहचणार पैसा ?

या नव्या योजनेंतर्गत या त्या इनऑपरेटीव्ह वा निष्क्रीय खात्यांना सामील केले गेले आहे, ज्यात एक हजार रुपये किंवा त्याहून कमी रक्कम जमा आहे. विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे की खातेधारकांना आता कोणत्याही स्वरुपाची कागदी कारवाई न करता ही रक्कम मिळणार आहे. ज्या लोकांचे खाते आधारकार्डशी जळलेले आहे. त्यांच्या बँक खात्यात विभागाद्वारा लागलीच पैसे जमा केले जाणार आहेत. उर्वरित शिल्लक खात्यातही हळूहळू ही रक्कम पोहचवली जाणार आहे.

सरकारचा प्लान?

जर कोणा ईपीएफओ खात्यात सतत तीन वर्षे कोणतेही गतिविधी झाली नाही, तर त्याला इनऑपरेटीव्ह किंवा निष्क्रीय खाते मानले जाणार आहे. सध्या पैसे परत मिळण्याची ही प्रक्रीया एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत सुरु केलेली आहे.सुरुवातीच्या टप्प्यात एकूण ३१ लाख निष्क्रीय खात्यातून सुमारे सहा लाख खात्यांची यासाठी निवड केली जाणार आहे. जर हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला तर उरलेल्या सुमारे २५ लाख निष्क्रीय खात्यासाठी देखील ही स्वयंचलित प्रक्रीया आपलीशी केली जाईल.

हजारो कोटी रुपये अडकले

आकड्यांवर नजर टाकली तर एकूण ३१.८६ लाख निष्क्रीय ईपीएफओ खाती अस्तित्वात आहे. ज्यात सुमारे १०,९०३ कोटी रुपये जमा आहेत. तसेच ज्या खात्यात १००० रुपयांपर्यंतची किरकोळ रक्कम पडून आहे त्ंयांची संख्या सहा लाख असून त्यात एकूण ३०.५२ कोटी रुपये जमा आहेत. ही अशी खाती आहेत ज्यात गेल्या २० वर्षांपासून कोणतेही गतिविधी झालेली नाही आणि त्यातील पैसे पडून आहेत.

रक्कम थेट त्यांच्यापर्यंत पोहचणार

श्रम मंत्रालयाच्या या मोठ्या निर्णयाचा फायदा ईपीएफओशी जोडलेल्या लाखो लोकांना मिळणार आहे. आतापर्यंत लोक नोकरी बदलल्यानंतर त्यांच्या जुन्या खात्याला विसरुन जात होते. वा छोट्या रकमेमुळे जटील कागदाची प्रक्रिया राबवण्यापेक्षा हे पैसे सोडून द्यायचे. आता या नव्या व्यवस्थेमुळे कोणतीही धावपळ न करता ही रक्कम थेट त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे. ज्या खात्यात वर्षानूवर्षे कोणतीही हालचाल झाली नाही.

Follow Us
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.