AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : ऑफिसच्या डेस्कवर ठेवा लाकडापासून बनवलेली छोटी वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही

फेंग शुई हे चिनी वास्तुशास्त्र आहे, घरात पैसा टिकून राहावा, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं अपेक्षित फळ मिळावं यासाठी फेंग शुईमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Feng Shui : ऑफिसच्या डेस्कवर ठेवा लाकडापासून बनवलेली छोटी वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
Feng ShuiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 23, 2026 | 8:35 PM
Share

फेंग शुई शास्त्रानुसार तुमच्या घरात दोन प्रकारच्या ऊर्जेचं अस्तित्व असतं, एक सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा, जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्यावर विविध प्रकारची संकट येऊ शकतात. या उलट जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा घरात नेहमी शांत वातावरण राहाते, आर्थिक स्थैर्य लाभते, घरात सुख समृद्धी येते. फेंग शुई मध्ये असे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमांचं पालन करून आपण ऊर्जेचं योग्य प्रकारे संतुलन करू शकतो. फेंग शुईनुसार केवळ तुमची वास्तू म्हणजे तुमच्या घराचाच तुमच्यावर प्रभाव नसतो, तर तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये ज्या काही वस्तू ठेवल्या आहेत, त्याचा देखील सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. त्यामुळे आपण आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये कोणत्या वस्तू ठेवत आहोत, याकडे देखील लक्ष देणं गरजेचं असतं. फेंग शुई नुसार तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ज्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी ठेवता त्याचा प्रभाव हा तुमची कामगिरी, तुमचा आत्मविश्वास तुमचं यश यावर पडत असतो, त्यामुळे फेंग शुई शास्त्रामध्ये अशा काही वस्तू सुचवण्यात आल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऊर्जेचं योग्य संतुलन साधू शकतात.

फेंग शुईशास्त्रानुसार जर लाकडापासून बनवलेली कोणतीही छोटी वस्तू तुम्ही जर तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवली तर त्यामुळे ऊर्जेचं योग्य प्रकारे संतुलन साधलं जातं. ज्याचा खूपच सकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडतो. तुमचा कामातील आत्मविश्वास वाढतो, तसेच काम करण्यासाठी तुम्हाला नवी ऊर्जा प्राप्त होते, तुमच्या सर्व समस्या दूर होतात. ऑफिसमध्ये प्रमोशनचा योग देखील येतो. ही लाकडी वस्तू म्हणजे कोणतीही असू शकते, एखादी लाकडाची फ्रेम किंवा मूर्ती किंवा इतर कुठलीही वस्तू ऑफिसच्या डेस्कवर ठेवा असं फेंग शुईमध्ये सांगितलं आहे.

लाकडी वस्तूसोबतच तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर लाफिंग बुद्धा, किंवा तीन पायाचा बेंडूक, धातुचं कासव अशा गोष्टी देखील ठेऊ शकतात, त्याचा देखील तुमच्यावर अत्यंत समकारात्मक प्रभाव पडतो आणि सर्व प्रकारची नकरात्मक ऊर्जा दूर होते, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप