एअरटेलचा ‘हा’ प्लॅन आहे खूपच खास , 5G OTT आणि AI; सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध

एअरटेल आपल्या प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे प्लॅन ऑफर केले जातात. जर तुम्ही असे वापरकर्ता असाल ज्यांना बेसिक मोबाईल बेनिफिट्स व्यतिरिक्त प्लॅनमधून बरेच फायदे मिळण्याची अपेक्षा आहे, तर आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात...

एअरटेलचा हा प्लॅन आहे खूपच खास , 5G OTT आणि AI; सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 20, 2025 | 3:34 PM

आपल्या भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. प्रत्येक टेलिकॉम कंपनी त्यांचे ग्राहकांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी व वाढवण्यासाठी नवीन प्लॅन लाँच करत असतात. तर या प्रीपेड मार्केटमधील स्पर्धेत एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅन खूपच वेगळा आहे. तर हा प्लॅन फक्त टॉकटाइम आणि दैनिक डेटासह बरेच काही ऑफर्स देत आहे. हा एक असा प्लॅन आहे जो 28 दिवसांच्या वैधतेमध्ये हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, मनोरंजन आणि स्मार्ट फीचर्स एकत्र आणतो.

या प्लॅनच्या मूलभूत फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात दररोज 3 GB डेटा, अमर्यादित लोकल, STD आणि रोमिंग कॉल आणि दररोज 100 एसएमएस असे ऑफर्स देण्यात येत आहे. तर हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना उच्च व्हॉल्यूम डेटा आणि कॉल हवे आहेत. परंतु या प्लॅनला खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याचे अतिरिक्त फायदे.

सबस्क्राइबर्सना Airtel Xstream Play Premium चा पूर्ण अॅक्सेस या प्लॅनमधून मिळणार आहे, ज्यामध्ये Sony LIV, Lionsgate Play, Aha, Hoichoi, Chaupal, आणि SunNxt सारखे 22+ ओटीटी प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत. हे 28 दिवसांसाठी नॉन-स्टॉप स्ट्रीमिंगचा आनंद देतात .

ज्या भागात 5G कव्हरेज आहे, तिथे हा प्लॅन दैनंदिन मर्यादेनंतर अमर्यादित 5G डेटा देतो. स्ट्रीमिंग, गेमिंग किंवा कामासाठी अल्ट्रा-फास्ट स्पीड हव्या असलेल्या वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन गेम-चेंजर आहे.

एअरटेलने या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वैयक्तिकरणासाठी विशेष फिचर्स देखील जोडली आहेत. त्यांचे स्पॅम फाइटिंग नेटवर्क, इनकमिंग कॉल आणि एसएमएसवर रिअल-टाइम अलर्ट देते. तसेच फ्रॉड कॉल किंवा मेसेज असल्याचे आढळताच ते ‘एअरटेल वॉर्निंग: स्पॅम’ सारखे अलर्ट देते. तसेच वापरकर्ते दर 30 दिवसांनी मोफत हॅलोट्यून सेट करू शकतात, जे पर्सनल टच देतात.

तर या प्लॅनमध्ये दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत कमी होणार आणि 100 एसएमएस मर्यादा ओलांडल्यावर, लोकल एसएमएससाठी 1 रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये शुल्क आकारले जाईल.

5जी, स्ट्रीमिंग, एआय आणि स्पॅम संरक्षण एकत्रित करणारा, एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅन आजच्या डिजिटल-फर्स्ट जीवनशैलीसाठी परिपूर्ण आहे. हा उपलब्ध असलेल्या सर्वात विचारपूर्वक डिझाइन केलेल्या प्रीपेड प्लॅनपैकी एक आहे.

ही योजना कोणासाठी आहे?

एअरटेलचा 449 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहे ज्यांना फक्त डेटा आणि कॉल्सपेक्षा जास्त हवे आहे. जर तुम्हाला नियमितपणे स्ट्रीमिंग हवे असेल, हाय-स्पीड 5जी हवे असेल, एआय टूल्समधून स्मार्ट उत्पादकता हवी असेल आणि स्पॅमपासून संरक्षण हवे असेल, तर हा प्लॅन उत्तम मूल्य देतो. विद्यार्थी असो, काम करणारे व्यावसायिक असो किंवा मनोरंजन प्रेमी असो, हा ऑल-इन-वन रिचार्ज अशा लोकांसाठी आहे जे ऑनलाइन जीवन जगतात आणि त्यांच्या रिचार्ज प्लॅनकडून जास्त अपेक्षा करतात.