AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phone 15 Price : आज लॉन्च होणार आयफोन 15 सिरीज, किंंमत, फिचर्स आणि कॅमेराबद्दल आले महत्त्वाचे अपडेट्स

Phone 15 Price तुम्ही अॅपलचे चे युट्यूब चॅनल, अॅपल टिव्ही आणि अधिकृत वेबसाइट द्वारे लॉन्च इव्हेंट पाहू शकाल. आयफोन म्हंटल की सर्वाधीक उत्सुकता असते ती म्हणजे त्याच्या किंमतीची.

Phone 15 Price : आज लॉन्च होणार आयफोन 15 सिरीज, किंंमत, फिचर्स आणि कॅमेराबद्दल आले महत्त्वाचे अपडेट्स
आयफोन 15 Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 12, 2023 | 11:06 AM
Share

मुंबई : अवघ्या काही तासांतच आयफोन 15 (iPhone 15) मालिकेचे तपशील आपल्या सर्वांना माहित असतील. अॅपलचा ‘वंडरलस्ट इव्हेंट’ आज रात्री 10:30 वाजता सुरू होईल. यामध्ये कंपनी लोकांना आयफोन 15 सीरीज, स्मार्टवॉच सीरीज 9, वॉच अल्ट्रा 2 आणि नवीन OS वर अपडेट्स देईल. कंपनी यूएसबी टाइप-सी चार्जिंगसह त्याचे प्रसिद्ध एअरपॉड्स प्रो देखील लॉन्च करू शकते. तुम्ही अॅपलचे चे युट्यूब चॅनल, अॅपल टिव्ही आणि अधिकृत वेबसाइट द्वारे लॉन्च इव्हेंट पाहू शकाल. आयफोन म्हंटल की सर्वाधीक उत्सुकता असते ती म्हणजे त्याच्या किंमतीची. लॉन्च होण्यापूर्वी अॅपलच्या आयफोन 15 सीरीजची किंमत किती असू शकते जाणून घेऊया.

या किमतीत भारतात मिळेल आयफोन 15

अॅपलचा आयफोन 15 सीरीज भारतात 80,000 रुपयांपासून सुरू होऊ शकतो. त्याच वेळी, आयफोन 15 प्लसची किंमत 89,900 रुपये असू शकते. लीक्समध्ये असे म्हटले आहे की प्रो मॉडेलची किंमत 100 डॉलर्स जास्त असू शकते आणि प्रो मॅक्सची किंमत 200 डॉलर जास्त असू शकते. यावेळी किंमत वाढण्याची शक्यता आहे कारण कंपनीने नवीन मॉडेल्सच्या प्रो व्हेरियंटमध्ये कॅमेरा, पेरिस्कोप लेन्स, झूम क्षमता, फास्ट चार्जिंग, मोठी बॅटरी इत्यादी काही अपडेट्स दिले आहेत. कंपनीने गेल्या वर्षी यूएसमध्ये लॉन्च केलेला आयफोन 14 चा प्रो व्हेरिएंट 999 डॉलर्स आणि प्रो मॅक्स 1,099 डॉलर्समध्ये लॉन्च केला होता. जर लीक खरे असतील तर कंपनी प्रो मॅक्स व्हेरिएंट भारतात 1,59,900 रुपयांमध्ये लॉन्च करू शकते.

स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला आयफोन 15 आणि 15 प्लसमध्ये 6.1 इंच डिस्प्ले मिळेल. यावेळी तुम्हाला बेस व्हेरिएंटमध्ये 48 मेगापिक्सल्स प्रायमरी कॅमेरा मिळेल. डायनॅमिक बेट वैशिष्ट्य देखील असेल. याशिवाय, दोन्ही फोनमध्ये 12 मेगापिक्सल्सअल्ट्रावाइड कॅमेरा असेल. प्रो मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी, यात ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये आयफोन 15 प्लसमध्ये 48 मेगापिक्सल्स मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सल्स अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल्स 3x टेलीफोटो लेन्स असेल. मेगापिक्सल्स प्रो मॅक्समध्ये तुम्हाला 3x ऐवजी 6x झूमिंग पेरिस्कोप लेन्स मिळेल.

कंपनी यावेळी बॅटरीची क्षमता देखील वाढवू शकते. लीकवर विश्वास ठेवला तर, आयफोन 15 प्लसमध्ये 3,877 mAh बॅटरी असू शकते, 15 प्लसमध्ये 4,912 mAh बॅटरी असू शकते, 15 Pro मध्ये 3,650 mAh बॅटरी असू शकते आणि 15 प्रो मॅक्समध्ये 4,852 mAh बॅटरी असू शकते. प्रो मॉडेल्समध्ये अॅपल 35 वॉट फास्ट चार्जिंग देऊ शकते असेही सांगितले जात आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.