Apple ने भारतीयांचा हिरमोड केला, भारतापेक्षाही या देशात आयफोन 17 सिरीज मिळतेय स्वस्त…

तुम्हाला माहिती आहे का ? कोणत्या देशात आयफोन 17 सिरीज सर्वात स्वस्तात विकली जात आहे. जर तुम्हाला वाटत असेल भारतात आयफोन 17 सर्वात स्वस्त विकला जात असेल तर तुमचा गैरसमज आहे.

Apple ने भारतीयांचा हिरमोड केला, भारतापेक्षाही या देशात आयफोन 17 सिरीज मिळतेय स्वस्त...
apple IPhone 17 Series launch
| Updated on: Sep 10, 2025 | 6:20 PM

अखेर बहुप्रतिक्षित iPhone 17 Series लाँच झाली आहे. या आयफोनच्या या नव्या मालिकेत iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Air आणि iPhone 17 Pro Max या फोनना उतरवण्यात आले आहे. तुम्ही देखील यातील कोणता पोन खरेदी करण्याची योजना आखत असाल तर त्याची किंमत किती आहे याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल. चला तर पाहूयात कोणत्या देशात आयफोन 17 सीरिज सर्वात स्वस्त मिळतेय हे पाहूयात….

तुम्हाला वाटत असेल की भारत आयफोन 17 सिरीज सर्वात कमी किंमतीत आहे तर असे नाही. भारतापेक्षा काही देशात आयफोन 17 मालिकेला स्वस्तात उतरवण्यात आले आहे.

iPhone 17 ची किंमत काय ?

भारतीय बाजारात आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 82 हजार 900 रुपये आहे. परंतू सर्वात महत्वाची बाब ही हा फोन अमेरिकेच्या बाजारात भारतापेक्षा स्वस्तात विकला जाणार आहे. युएसमध्ये आयफोन 17 ची किंमत 799 डॉलर ( सुमारे 70,500 रुपये ) ने सुरु झाली आहे.

चीनमध्ये देखील हा आयफोन 17 भारताहून स्वस्त मिळणार आहे. एप्पलच्या या लेटेस्ट मॉडलची किंमत 5999 चीनी युआन ( सुमारे 74,235 रुपये ) ने सुरु होत आहे. जपानमध्ये देखील हा फोन भारताहून कमी किंमतीत विकला जाणार आहे. जपानच्या बाजारात या फोनची किंमत JPY 129,800 ( सुमारे 77,594 रुपये ) ने सुरु होत आहे.

iPhone 17 Air ची किंमत

भारतीय बाजार iPhone 17 Air ची किंमत 1 लाख 19 हजार 900 रुपयांना सुरु होत आहे. युएसमध्ये एअर व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 999 डॉलर ( सुमारे 88400 रुपये ) ,चीन मध्ये सुरुवातीची किंमत 7999 चीनी युआन ( सुमारे 98,985 रुपये) आणि जपानमध्ये या फोनची किंमत JPY 159,800 (सुमारे 95,528 रुपये ) आहे.

iPhone 17 Pro ची किंमत

भारतात आयफोन प्रो मॉडेलची सुरुवातीची किंमत 1 लाख 34 हजार 900 रुपये आहे. तर चीनमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत 999 चीनी युआन (सुमारे 1,11,359 रुपये ), जपानमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत JPY 1,79,800 ( सुमारे 1,07,483 रुपये ) आणि युएसमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत 1099 डॉलर ( सुमारे 96,853 रुपये ) निश्चित केली आहे.

iPhone 17 Pro Max ची किंमत

भारतात प्रो मॅक्स मॉडलची सुरुवातीची किंमत 1,49,900 रुपये, चीनमध्ये या फोनची सुरुवातीच्या किंमत 9999 चीनी युआन (सुमार 1,23,734 रुपये),जपानमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत JPY 194,800 (सुमारे 1,16,450 रुपये )आणि युएसमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत 1199 डॉलर (सुमारे 1,05,666 रुपये ) निश्चित केली आहे.