14 सिम कार्ड स्लॉटशिवाय येणार Apple iPhone 14! जाणून घ्या कशी असेल ई-सिम सुविधा

अ‍ॅपलच्या (Apple) च्या आय़फोन 15 (iPhone 15) सिरीजमध्ये फिजिकल सिम कार्ड सपोर्ट असणार नाही. आयफोन 15 सिरीज 2023 मध्ये लॉन्च होईल. आयफोन 15 हा सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन असेल, असे आधीच सांगण्यात आले आहे.

14 सिम कार्ड स्लॉटशिवाय येणार Apple iPhone 14! जाणून घ्या कशी असेल ई-सिम सुविधा
Apple iPhone (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 11:41 AM

मुंबई : अ‍ॅपलच्या (Apple) च्या आय़फोन 15 (iPhone 15) सिरीजमध्ये फिजिकल सिम कार्ड सपोर्ट असणार नाही. आयफोन 15 सिरीज 2023 मध्ये लॉन्च होईल. आयफोन 15 हा सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन असेल, असे आधीच सांगण्यात आले आहे. तथापि, लेटेस्ट माहितीनुसार, अ‍ॅपलच्या आय़फोन 14 (Apple iPhone 14) सीरीजमध्येदेखील सिम कार्ड स्लॉट नसेल. Apple त्यांच्या नवीन iPhone 14 सिरीजमधील फोनमध्ये सिम कार्ड स्लॉटऐवजी e-SIM वापरणार आहे. अ‍ॅपल आपली पुढील सिरीज वॉटरप्रूफ बनवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. त्या दृष्टीने कंपनीने उचलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. आगामी दोन्ही सिरीजमधील स्मार्टफोन अधिक अपग्रेडेड असतील.

भारतात, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि जिओ या तिन्ही दूरसंचार कंपन्या ई-सिम सेवा देतात. जगभरात अशा अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या ई-सिम सेवा देतात. यामुळेच आयफोन 14 सीरीजमध्ये ई-सिम ऑफर केले जात आहे. त्यामुळे आगामी काळात युजर्ससाठी ई-सिम हा एक चांगला पर्याय उपलब्ध असेल.

ई-सिम म्हणजे काय?

Reliance Jio, Vodafone-Idea आणि Airtel भारतात ई-सिम सेवा देत आहेत. दूरसंचार कंपन्या ई-सिम ओव्हर-द-एअर सक्रिय करतात. ई-सिम हे मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल केलेलं आभासी (वर्चुअल) सिम आहे. ई-सिम प्रत्यक्ष सिम कार्डप्रमाणेच काम करते. तुम्ही ई-सिमसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये दुसरे कोणतेही सिम कार्ड इन्स्टर्ट करण्याची आवश्यकता नाही.

अ‍ॅपलने यापूर्वीच ई-सिम फीचर असलेले स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. iPhone XS आणि iPhone XS Max साठी ई-सिम फीचर लाँच करणारी अ‍ॅपल ही पहिली कंपनी होती. फिजिकल सिम कार्ड स्लॉट व्यतिरिक्त, कंपनीने नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 13 सीरीजमध्ये e-SIM चा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. युजर्स या फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरू शकतात, एक फिजिकल असेल आणि दुसरे ई-सिम कार्ड असेल. नवीन आयफोन 14 सीरीजमध्ये फक्त ई-सिमचाच पर्याय असेल अशी चर्चा आहे.

iPhone 14 सिरीजमध्ये ई-सिम सुविधा मिळणार

असे मानले जात आहे की Apple iPhone 14 सीरीजमध्ये e-SIM चा पर्याय उपलब्ध असेल. तथापि, iPhone 14 सिरीजमधील एक व्हेरिएंट सिम कार्ड स्लॉटसह येऊ शकतं. हे व्हेरिएंट केवळ त्या दूरसंचार ऑपरेटरसाठी उपलब्ध करून दिलं जाईल जे ई-सिम सेवा प्रदान करत नाहीत. कंपनी त्यांच्या पुढील सर्व सिरीज पूर्णपणे वॉटरप्रूफ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हेच आयफोन 14 सीरीजमध्ये ई-सिम देण्यामागील एक कारण असू शकते. असे देखील बोलले जात आहे की, युजर्स आयफोन 14 सीरीजचा फोन पाण्यात बराच काळ वापरू शकतात.

इतर बातम्या

11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स

PHOTO | फिटनेस प्रेमींसाठी लवकरच भारतात येतोय Redmi Smart Band pro.; मोठ्या डिस्प्लेसोबत आहेत आकर्षक फीचर्स !

ओप्पोच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज…फास्ट चार्जिंग मोबाईलच्या जगात आता ओप्पो ठेवणार पाय, स्मार्टफोन झटपट चार्ज होणार!

(Apple iPhone 14 can come without SIM card slot! know how e-SIM facility will work)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.