AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone चे ‘हे’ फीचर बेस्ट, कुणी वापरलंय का? वाचा

तुम्ही iPhone युजर्स असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला iPhone मधील खास सीक्रेट फीचर्सबद्दल माहिती नसेल तर आम्ही देत असलेली माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. हे कोणतं नवं फीचर आहे?, त्याचा नेमका फायदा काय आहे?, याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

iPhone चे ‘हे’ फीचर बेस्ट, कुणी वापरलंय का? वाचा
iPhone Magnifier ToolImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 15, 2024 | 2:46 PM
Share

iPhone घ्यायचा म्हणजे थोडं खर्चिकच असतं, त्यात iPhone साठी बजेट तयार करावं लागतं. आता यातही iPhone मध्ये मिळणाऱ्या खास फीचर्ससाठी देखील अधिकचे पैसे खर्च होतात. पण आपल्यापैकी बहुतेकांना iPhone च्या अनेक फीचर्सबद्दल अचूक माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सीक्रेट फीचर्सविषयी सांगणार आहोत.

iPhone चे Magnifier एक असे फीचर्स आहे, जे तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. अनेक युजर्सना याबद्दल माहिती नसेल. तर येथे आम्ही तुम्हाला हे फीचर कसे वापरावे आणि त्याचे काय फायदे आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.

Magnifier कॅमेऱ्याचा वापर

तुम्हालाही आपल्या iPhone मध्ये Magnifier कॅमेरा वापरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फार काही करावे लागणार नाही. फक्त अ‍ॅपच्या सर्च बारमध्ये Magnifier टाईप करून ते शोधा. यानंतर तुम्हाला Magnifier कॅमेऱ्याचा आयकॉन दाखवला जाईल. या आयकॉनवर क्लिक करा आणि आपण आता कॅमेरा वापरू शकता. हा कॅमेरा अगदी सामान्य कॅमेऱ्यासारखा काम करतो.

फीचर कसे वापरावे?

मध्यभागी फोटो कॅप्चर करण्याचा पर्याय, उजव्या बाजूला सेटिंग्ज आणि डाव्या बाजूला अ‍ॅक्टिव्हिटीज ऑप्शन्स आहेत. कॅप्चर बटणावर क्लिक केल्यास फोटो क्लिक होईल, त्यावरच तुम्हाला झूम करण्याचा पर्याय देण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा झूम करू शकता आणि कोणत्याही प्रॉडक्टचे स्पेसिफिकेशन तपासू शकता.

फीचर्समध्ये कशाचा समावेश?

सेटिंग्जच्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही सेटिंग्ज कस्टमाइज करू शकता, ज्यामध्ये तुम्ही ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, फिल्टर, टॉर्च, फोकस लॉक, कॅमेरा आणि कॅप्चर मोडचा समावेश करता. यामध्ये तुम्ही एखाद्या फोटोकडे बोट दाखवून फोटो क्लिक केला, तर रीडर्सवर क्लिक करा, मग तुमचा फोन तिथे काय लिहिलं आहे ते वाचेल.

यासाठी तुम्हाला फक्त सेटिंग्जमध्ये जाऊन कॅप्चरवर क्लिक करावं लागेल, दोन ऑप्शन शो असतील, शो इन कंट्रोल पॅनेल आणि दुसरा ऑलवेज शो प्लेबॅक कंट्रोल असेल, यापैकी तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर फोटोमध्ये काय लिहिलं आहे ते तुमचा फोन वाचेल.

आज आम्ही तुम्हाला Magnifier या फीचर्सविषयी सर्व माहिती सांगितली आहे. Magnifier कसे वापरावे, त्यात कोणत्या गोष्टी आहे, याची सर्व माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरूर शकते. आपल्यापैकी बहुतेकांना iPhone च्या अनेक फीचर्सबद्दल अचूक माहिती नसते. ती माहिती झाल्यास तुमचे काम अधिक सोपे होते.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.