अॅपलकडून ‘स्मार्ट रिंग’ लाँच, फोनला हात न लावता ऑपरेटिंग

| Updated on: Oct 18, 2019 | 5:45 PM

प्रिमिअम स्मार्टफोन मेकर अॅपल कंपनीने टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. नुकतेच अॅपलने एक स्मार्ट रिंग लाँच (Apple launch smart ring) केली आहे.

अॅपलकडून स्मार्ट रिंग लाँच, फोनला हात न लावता ऑपरेटिंग
Follow us on

मुंबई : प्रिमिअम स्मार्टफोन मेकर अॅपल कंपनीने टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. नुकतेच अॅपलने एक स्मार्ट रिंग लाँच (Apple launch smart ring) केली आहे. ही रिंग बोटात घातल्यावर तुम्ही आयफोन किंवा इतर फोन तुम्ही हात न लावता ऑपरेट करु शकता. कंपनीने या रिंगसाठी (Apple launch smart ring) पेटेंट फाईल केले आहे. या रिंगमध्ये टचस्क्रीन, व्हॉईस कमांड आणि हँड जेस्चर कंट्रोलसारखे फीचर दिले आहेत.

अॅपलकडून पेटेंट फाईल

अॅपलकडून पेटेंटचे टायटल ‘मेथड अँड युजर इंटरफेस फॉर ए विअरेबल इलेक्ट्रॉनिक रिंग कंप्यूटिंग डिव्हाईस’, असं ठेवले आहे. पेटेंटमध्ये ड्रॉईंग ऑफ पोटेन्शल डिझाईन, रिचार्जेबल पॉवर सोर्स आणि व्हायरलेस ट्रान्स-रिसीवरसारख्या फीचर्सचा समावेश केला आहे.

रिंगमध्ये टचस्क्रीन दिली आहे

रिंग कोणत्याही बोटात घालू शकता. या रिंगच्या मदतीने युजर्स आयफोन आणि आयपॅडचा वापर चांगला करता येणार आहे, असं कंपनीने सांगितले आहे. या डिझाईमध्ये अनेक बटन्स, स्पीकर आणि टचस्क्रीनचा समावेश आहे.

लांबूनही अॅपल डिव्हाईसवर कंट्रोल

सतत आयफोन किंवा आयपॅड हातात घेऊन फिरणे कठीण होते. अशामध्ये ही रिंग तुमच्या उपयोगी पडू शकते. या रिंगच्या माध्यमातून तुम्ही फोनपासून थोडे लांबही उभे राहिले तरी तुम्ही फोनवर कंट्रोल ठेवू शकता. तसेच जर फोन कुठे विसरला आणि तो शोधायचा असल्यास तुम्ही या रिंगची मदत घेऊ शकता. या रिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनचे अचूक ठिकाण शोधू शकता. त्यामुळे युजर्सचा फोन सुरक्षित राहू शकतो.