
iPhone 17 Pro Max ची मागील काही दिवसांपासून लोक मोठ्या प्रमाणात वाढ पाहत होते. शेवटी प्रतिक्षा संपली असून भारतात iPhone 17 Pro Max विक्री सुरू झालीये. पहिल्यांदा Apple चा हा फ्लॅगशिप फोन कमी किंमती मिळतोय. विशेष म्हणजे हा फोन खास डिझाईन करण्यात आला असून अत्यंत खास आहे. आतापर्यंत कंपनीने तयार केलेल्या फोनपैकी हा आयफोन सर्वात भारी म्हणून ओळखला जाणार आहे. नवीन प्रो लाइनअपमध्ये पुन्हा डिझाइन केलेली कॅमेरा सिस्टम, प्रो चिप आणि खास गोष्ट म्हणजे आयफोनमधील सर्वात जास्त काळ टिकणारी बॅटरी लाइफ देखील समाविष्ठ आहे. आयफोन 17 प्रो मॅक्स आतापर्यंतचे सर्वात मोठे अपग्रेड आहे.
आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे अॅपलच्या नवीन आणि सर्वोत्कृष्ट 3 नॅनोमीटर A19 प्रो मोबाइल प्रोसेसर आहेत. हे दोन्ही फोन आयफोनच्या इतिहासातील टॉप फोन ठरणार आहेत. आयफोन 17 प्रोबद्दल भारतीय लोकांमध्ये मोठी क्रेश ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. आता या फोनची मागणी भारतीय बाजारपेठेत प्रचंड वाढल्याचे सध्या बघायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून लोकांनी याकरिता फोन घेणे देखील थांबवले होते. आयफोन 17 प्रो लॉन्च झाल्यानंतर त्याची मागणी प्रचंड वाढलीये.
आयफोन 17 आणि आयफोन 17 एअरमध्ये 8 जीबीच्या तुलनेत 12 जीबी अपेक्षेप्रमाणे तुम्हाला जास्त रॅम मिळणार आहे. अॅपल या नवीन चिपला जटिल व्हेपर चेंबर कूलिंगसह पूरक करत आहे. यामध्ये बॅटरी देखील मोठी आहे. कॅमेरा सिस्टीम हा या शोचा स्टार आहे. दोन्ही प्रो मॉडेल्समध्ये एक नवीन, मोठा 48-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आहे जो आश्चर्यकारक तपशील आणि अभूतपूर्व कमी प्रकाश कामगिरी कॅप्चर करण्यासाठी डिझाइन केलेला दिसतो.
आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे मंगळवार 9 सप्टेंबर पासून प्री ऑर्डरसाठी उपलब्ध असतील, ज्यांची किंमत 1,34,900 आणि 1,49,900 रुपये आहे. ते तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत: कॉस्मिक ऑरेंज, डीप ब्लू आणि सिल्व्हर. या फोनबद्दल भारतीयांमध्ये प्रचंड अशी क्रेझ आहे.