
फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये केवळ स्मार्टफोनच नाही तर स्मार्ट टीव्हीवरही बंपर डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही घर किंवा ऑफिससाठी 55 इंच स्क्रीन आकाराचा मोठा एलईडी टीव्ही शोधत असाल तर तुमच्याकडे सेलमध्ये स्वस्त किमतीत 55 इंचाचा टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. ब्लॅक फ्रायडे सेलसाठी बँक ऑफ बडोदा (BOB) आणि HSBC ने हातमिळवणी केली आहे, जर तुम्ही सेल दरम्यान खरेदीसाठी यापैकी कोणत्याही बँक कार्डचा वापर केला तर तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट मिळेल. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्मार्ट टिव्हीच्या सवलतीबद्दल जाणून घेऊयात.
फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान आयफॅल्कॉन बाय टीसीएलचा हा मोठा 55 इंचाचा टीव्ही 63% सवलतीत उपलब्ध आहे. सवलतीनंतर हे मॉडेल तुम्ही 23,999 मध्ये खरेदी करू शकता. 24W साउंड आउटपुट आणि 60Hz रिफ्रेश रेट असलेला हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, जिओ हॉटस्टार, झी5 आणि यूट्यूब सारख्या अॅप्सना सपोर्ट करतो.
फ्लिपकार्ट सेल दरम्यान रियलमीचा हा टीव्ही त्याच्या निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकला जात आहे, ज्यामध्ये 57% सूट देण्यात येत आहे. सवलतीनंतर हा टीव्ही तुम्ही 27,999 मध्ये विकत घेऊ शकता. 40-वॅट साउंड आउटपुटसह, हा टीव्ही 2 जीबी रॅम आणि 16जीबी स्टोरेजसह येतो आणि प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारख्या अॅप्सना सपोर्ट करतो.
ब्लाउपंक्ट कंपनीच्या या 55 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 70 वॅट साउंड आउटपुट, डॉल्बी अॅटमॉस, चार स्पीकर्स, एआय स्मूथ मोशन रेट, एचडीआर10, गुगल असिस्टंट आणि 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान 36% डिस्काउंटनंतर हा टीव्ही 28,999 रुपयांना विकला जात आहे.
सेलमध्ये मोटोरोला स्मार्ट टीव्ही देखील अर्ध्या किमतीत विकला जात आहे. 50% सवलतीनंतर, तुम्ही हे मॉडेल 29,499 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीमध्ये 48-वॅट साउंड आउटपुट, 60Hz रिफ्रेश रेट, 4K रिझोल्यूशन आणि नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, जिओ हॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या अॅप्सना सपोर्ट आहे.
टीप: ही बातमी फक्त माहितीसाठी आहे, कोणताही टीव्ही निवडण्यापूर्वी, उत्पादनाबद्दल लोकांनी दिलेला फिडबॅक वाचा.