AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुड न्यूज! या मोबाईलमध्ये मिळतोय Airtel 5Gचा सपोर्ट, लिस्ट जारी; तुमचा फोन तर यात नाही ना?

जर तुम्ही Airtel 5G नेटवर्कच्या परिसरात राहत असाल आणि वरीलपैकी कोणत्याही स्मार्ट फोनचा वापर करत असाल तर तुम्हाला 5G नेटवर्क मिळू शकते.

गुड न्यूज! या मोबाईलमध्ये मिळतोय Airtel 5Gचा सपोर्ट, लिस्ट जारी; तुमचा फोन तर यात नाही ना?
गुड न्यूज! या मोबाईलमध्ये मिळतोय Airtel 5Gचा सपोर्टImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2022 | 5:36 PM
Share

नवी दिल्ली: वन प्लस (OnePlus) आणि ओप्पोचा (Oppo) स्मार्ट फोन असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Airtel 5G आता सर्वच पात्र वन प्लस आणि ओप्पो स्मार्ट फोन्सला सपोर्ट करणार आहे. Airtel 5G तुमच्या विभागात असेल तर तुम्ही या ब्रँडच्या 5G फोनचा वापर करू शकता. यासाठी सीमकार्ड अपग्रेड करण्याची गरज नाही. त्यामुळे आता तुम्हीही 5G नेटवर्कचा आनंद मनमुराद लुटू शकता.

गेल्याच महिन्यात Airtel 5G नेटवर्क लॉन्च करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक स्मार्ट फोनला याचा सपोर्ट मिळू लागला आहे. आता OnePlus आणि Oppo च्या स्मार्ट फोन्सवर Airtel 5Gची सर्व्हिसचा वापर करता येणार आहे. एका रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

टेलिकॉम टेकच्या एका रिपोर्टनुसार, Airtel 5Gला आता वन प्लस आणि ओप्पोच्या सर्व 5G स्मार्ट फोन मॉडलवर वापरता येऊ शकते. दरम्यान, दोन्ही स्मार्ट फोन ब्रँडने याची अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.

याबाबत एअरटेलनेही कोणतीच घोषणा केलेली नाही. मात्र, वन प्लस आणि ओप्पोच्या सर्व 5G स्मार्ट फोनची लिस्ट त्यांच्या वेबसाईटवर पाहता येऊ शकते, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. म्हणजे या कंपन्यांच्या सर्व 5G फोनवर Airtel 5Gचा आनंद घेता येणार आहे.

नुकताच OnePlusच्या OnePlus 8, OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus Nord 2 आणि OnePlus 9R लाही एयरटेल 5G चा सपोर्ट मिळाला आहे.

या शिवाय OnePlus 9 Pro, OnePlus Nord CE OnePlus Nord, OnePlus 9, OnePlus Nord CE Lite 2, OnePlus 10R, OnePlus Nord CE 2, OnePlus 10 Pro 5G, OnePlus Nord 2T, OnePlus 10T, OnePlus 9RT, OnePlus 8, OnePlus 8T, OnePlus 8 Pro, OnePlus Nord 2 आणि OnePlus 9R वर Airtel च्या 5G NSA चा वापर केला जाऊ शकतो.

Oppo च्या सर्व 5G डिव्हाइसवर Airtel 5G चा सपोर्ट मिळत आहे. आता Oppo F19 Pro Plus, Oppo Reno5G Pro, Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro, Oppo A53s,Oppo A74, Oppo Reno 7 Pro 5G, Oppo F21 Pro 5G, Oppo Reno 7, Oppo Reno 8, Oppo Reno 8 Pro, Oppo K10 5G आणि Oppo F21s Pro 5G वर एयरटेलची 5G सर्व्हिस वापरता येणार आहे.

जर तुम्ही Airtel 5G नेटवर्कच्या परिसरात राहत असाल आणि वरीलपैकी कोणत्याही स्मार्ट फोनचा वापर करत असाल तर तुम्हाला 5G नेटवर्क मिळू शकते.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.