AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकीच्या नंबरवर केलंत रीचार्ज ? टेन्शन नही लेनेका, असे परत मिळवा तुमचे पैसे !

Phone Recharge : आजकाल ऑनलाइन रिचार्जच्या जमान्यात कधी घाईत आपण चुकीच्या नंबरवर रिचार्ज करतो. अशा वेळी काय करावे, ते जाणून घेऊया.

चुकीच्या नंबरवर केलंत रीचार्ज ? टेन्शन नही लेनेका, असे परत मिळवा तुमचे पैसे !
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 05, 2023 | 2:46 PM
Share

नवी दिल्ली : एक काळ असा होता की लोक दुकानात जाऊन मोबाईल रिचार्ज (mobile recharge) करण्यासाठी टॉप अप कार्ड खरेदी करायचे. त्यावेळी इंटरनेटही खूप महाग होते आणि दुकानदार हुशारीने रिचार्ज करायचे. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी नवनवीन तंत्रं (new technology) बाजारात येऊ लागली आणि आज घरबसल्या रिचार्ज करता येते. तुम्ही सहसा रिचार्जसाठी वेगवेगळे ॲप्स वापरत असाल. पण बऱ्याच वेळेस असं होतं की घाईघाईत आपण चुकीचं रिचार्ज (recharge on wrong number) करतो. जर रिचार्जची रक्कम लहान असेल तर लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु जर मोठी रक्कम असेल तर पैसे वाया गेल्याबद्दल त्रास होऊ शकतो.

पण जर चुकीच्या नंबरवर रिचार्ज केले असेल तर हे पैसे परत मिळू शकतात हे बहुतेकांना माहीत नसते. कदाचित तुम्हालाही याबद्दल माहिती नसेल. अशा वेळी काय करावे, ते जाणून घेऊया.

चुकीचा नंबर टाकलात तर काय करावे ?

जर तुम्ही चुकून किंवा घाईघाईत चुकीच्या नंबरवर रिचार्ज केले असेल, तर तुम्ही ज्या टेलिकॉम ऑपरेटरचे सिमकार्ड वापरता त्याच्या कस्टमर केअरला लगेच कॉल करा आणि त्यांना सर्व माहिती द्या. म्हणजेच रिचार्ज कधी केले, रक्कम किती होती, कोणत्या कंपनीचा नंबर रिचार्ज झाला, कोणत्या ॲपद्वारे रिचार्ज करण्यात आले, अशी संपूर्ण माहिती द्यावी.

याशिवाय, तुम्ही हा संपूर्ण तपशील संबंधित कंपनीला ईमेलद्वारे पाठवू शकता, ज्यामुळे तुमचे पैसे परत मिळू शकतील. भारतातील बहुतेक लोक व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि एअरटेलचे सिमकार्ड वापरतात, त्यांचा ई-मेल आयडी तुम्ही सहज मिळवू शकता. त्यांना मेलवरून व्यवस्थित माहिती पाठवू शकता.

टेलिकॉम कंपनीने ऐकलं नाही तर काय कराल ?

अनेक वेळा असंही दिसून येते की टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत आणि त्यावर दीर्घकाळ कोणताही रिप्लाय मिळत नाही. तुमच्या तक्रारीवरही दूरसंचार कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही, तर तुम्ही ग्राहक सेवा पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हॉट्सॲपद्वारेही तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही प्ले स्टोअरवरून कस्टमर सर्व्हिस पोर्टलचे ॲप डाउनलोड करून तक्रार दाखल करू शकता.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वेळेवर तक्रार दाखल केलीत तरच तुमचे पैसे परत मिळती. तसेच ज्या क्रमांकावर रिचार्ज केले आहे त्या क्रमांकाशी तुमचा मोबाइल क्रमांक जुळणेही आवश्यक आहे. म्हणजेच एक किंवा दोन नंबरमुळे रिचार्ज चुकीच्या नंबरवर गेला असेल तर अशा परिस्थितीत पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. जर संपूर्ण आकडा वेगळा असेल, तर अशा परिस्थितीत कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करते कारण बरेच लोक कंपनीला जाणीवपूर्वक त्रास देतात.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.