WhatsApp विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, नवे गोपनीयता धोरण बरखास्त करण्याची मागणी

| Updated on: Jan 16, 2021 | 9:14 PM

व्हॉट्सॲपने गोपनीयतेचे रक्षण करणारी धोरणं आखली पाहिजेत, असेही यात याचिकेत म्हटलं आहे. (CAIT Filed Petition In SC Against Whatsapp) 

WhatsApp विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, नवे गोपनीयता धोरण बरखास्त करण्याची मागणी
Follow us on

मुंबई : कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने नुकतंच WhatsApp च्या नवीन गोपनीयता धोरण बरखास्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. WhatsApp च्या नवीन गोपनीयता धोरणानुसार, त्यांनी नागरिकांच्या विविध मुलभूत हक्कांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपसारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या चालवण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना तयार करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसेच व्हॉट्सॲपने नागरिकांच्या गोपनीयतेचे रक्षण करणारी धोरणं आखली पाहिजेत, असेही यात याचिकेत म्हटलं आहे. (CAIT Filed Petition In SC Against Whatsapp)

या याचिकेत युरोपियन संघ आणि भारतातील देशांमधील WhatsApp ची नवीन गोपनीयता धोरणांबाबतची माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपसारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे भारतीय युजर्सच्या डेटाचा कसा काय गैरवापर केला जाऊ शकतो, असा सवालही उपस्थित केला आहे. ही याचिका अबीर रॉय यांनी तयार केली आहे. वकील विवेक नारायण शर्मा यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी केलेल्या आरोपानुसार, व्हॉट्सॲपने ‘My Way किंवा High way’ असा दृष्टीकोन स्वीकारला आहे. यासारखे धोरण मनमानी, अन्यायकारक, असंवैधानिक आहे. हे धोरण भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशात स्वीकारले जाऊ शकत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप या नव्या धोरणाच्या नावे चुकीच्या पद्धतीने वैयक्तिक युजर्सचा डेटा गोळा करत आहे. दरम्यान व्हॉट्सॲप भारतात लाँचदरम्यान वापरकर्त्यांचा डेटा आणि खासगी माहिती सुरक्षित असल्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाद्वारे त्यांनी युजर्सला आकर्षित केले.

युजर्सच्या गोपनीयता धोक्यात

मात्र 2014 ला फेसबुककडून WhatsApp चे टेकओव्हर करण्यात आले. त्यानंतर अनेक युजर्सकडून डेटा सुरक्षितेतबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावेळी व्हॉट्सॲप खासगी डेटा फेसबुकसोबत शेअर करेल, अशी युजर्सला भिती होती. मात्र त्यानंतर व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांचा डेटा आणि खासगी माहिती सुरक्षित आहे. या गोपनीयता धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही, असे सांगितले होते.

पण त्यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये WhatsApp ने एक नवीन गोपनीयता धोरण मांडले. या धोरणात WhatsApp ने आपल्या वापरकर्त्यांच्या अधिकारांवर कठोरपणे तडजोड केली. त्यामुळे युजर्सची गोपनीयता कमजोर झाली.

युजर्सचा डेटा फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केला जाणार

WhatsApp च्या नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. व्हॉट्सॲपवरील डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने आता स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहील. असं म्हटलं जातंय की, जवळपास आपली WhatsApp सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाईल. (CAIT Filed Petition In SC Against Whatsapp)

संबंधित बातम्या : 

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर