आता डासांचे काम एका झटक्यात तमाम, चीनची डासांसाठी एअर डिफेन्स सिस्टीम, लेझरने डासांना ठार करणार

जेव्हा या मशिनला टार्गेट किटक किंवा डास सापडतो, तेव्हा ते त्याच्या पोझिशनिंगचा पत्ता लावते आणि एक लेझर पल्स पाठवते. त्यानंतर डासांच्या पखांवर थेट वार झाल्याने ते खाली कोसळतात...

आता डासांचे काम एका झटक्यात तमाम, चीनची डासांसाठी एअर डिफेन्स सिस्टीम, लेझरने डासांना ठार करणार
china portable laser device kill Mosquitoes
| Updated on: Aug 20, 2026 | 9:53 PM

बीजिंग: युद्धात ड्रोनना नष्ट करण्यासाठी जसे लेझर आधारित एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला जातो, तसा चीन आता डासांचा नायनाट करण्यासाठी उपाय शोधला आहे. चीनच्या या लेझर – बेस्ड एअर डिफेन्सच्या आयडीयेला पुढे वाढवत डासांना मारण्यासाठी ही लेझर टेक्नॉलॉजी वापरली आहे. चीनच्या या तंत्रज्ञानाने लेझर डिव्हाईस तयार केली आहे. जी हवेत उडणाऱ्या डासांचा खात्मा करते. फोटॉन मॅट्रिक्स लॅबने या तंत्रज्ञानास विकसित केले आहे. याची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे.

युरेशियन टाईम्सच्या वृत्तानुसार मॅन्युफॅक्चरर फोटॉन मॅट्रिक्स लॅबने सांगितले की चीनमध्ये डिझाईन झालेले हे पोर्टेबल लेझर डिव्हाईस आता मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहे. हे हवेत उडणाऱ्या डासांना मारण्यासाठी तयार करण्यात आले आहे. चीने अलिकडच्या वर्षांत यात चांगली प्रगती केली आहे. ही सिस्टीम त्याला एक पाऊल पुढे नेते.

कसे काम करते…

फोटॉन मॅट्रिक्स पोर्टेबल लेझर-बेस्ड मॉस्किटो डिफन्स सिस्टीमला एक ऑटोमेटेड, केमिकल-फ्री मॉस्किटो एअर डिफेंस डिव्हाईस म्हणून विकले जात आहे. हा सेंसर आणि अचूक लेझरचा वापर करत हवेत डासांचा तसेच इतर किटकांना पिच्छा पुरवते. त्यांना ट्रॅक केल्यानंतर त्यांचे पखं तोडून त्यांना फिजिकली अपंग करते. ही सिस्टीम दोन व्हर्जनमध्ये येते. इन्फ्रारेड आणि ब्ल्यु लेझर !

ही लेझर-बेस्ड मॉस्किटो डिफेन्स सिस्टीम टार्गेटला लॉक करण्यासाठी स्पेशल स्कॅनिंग आणि अंतर मोजण्यासाठी LiDAR चा वापर करते. हालचालींचा पत्ता लावण्यासाठी मिलीमीटर-व्हेव रडारचा वापर करते. तसेच छोट्या टार्गेटच्या उपस्थितीचा थांगपत्ता लावण्यासाठी कुत्रिम बुद्धीमत्ता (AI) आणि व्हीजन मॉड्युलचा वापर करते.

डासांवर पल्स फायर

उत्पादकांच्या मते अखेरच्या पायरीत गॅल्वेनोमीटर ( गॅल्वो ) कंट्रोल्ड लेझर डासांना मारण्यासाठी एक छोटा पल्स तयार करते. हे पोर्टेबल डिव्हाईस ९० डिग्रीच्या हॉरिझॉन्टल विमानाला स्कॅन करु शकते. जेव्हा त्याला कोणताही टार्गेट किटक मिळतो. तेव्हा ते त्याच्या पोझिशनिंगचा पत्ता लावतो. आणि एक लेझर पल्स पाठवतो. त्यानंतर डासांच्या पखांवर वार झाल्याने ते खाली कोसळतात.

फोटॉन मैट्रिक्स यांनी म्हटले आहे की ऑगस्ट २०२६ मध्ये या मशिनचे प्रोडक्शन सुरु झाले आहे. कंपनीने आता एक ऑफीशियली वेब स्टोर लाँच केले आहे.येथून ग्राहक थेट ही मशिन खरेदी करु शकतात.फोटॉन मॅट्रिक्स मॉस्किटो किलर आणि अत्याधुनिक ड्रोन विरोधी लेझर शस्रास्रांमध्ये शोध घेणे, ट्रॅक करणे, निशाना लावणे आणि मारण्याचा एक बेसिक प्रोसेस असते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us