AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Curved की Flat डिस्प्ले, कोणता स्मार्टफोन बेस्ट? फायदे-तोटे जाणून घ्या

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का, त्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी हे समजून घेणे आवश्यक आहे की, फ्लॅट स्क्रीन फोन किंवा कर्व्ह्ड डिस्प्ले असलेला फोन, यापैकी कोणता खरेदी करण्यासाठी चांगला? याविषयी जाणून घ्या.

Curved की Flat डिस्प्ले, कोणता स्मार्टफोन बेस्ट? फायदे-तोटे जाणून घ्या
Curved and flat display smartphone Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 15, 2024 | 2:30 PM
Share

फ्लॅट स्क्रीन फोन किंवा कर्व्ह्ड डिस्प्ले असलेला फोन, यापैकी कोणता स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी चांगला ठरेल? असा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर उत्तर देण्यासाठी तुम्हाला उमजणार नाही. पण, आज आम्ही तुम्हाला याच गोष्टींची माहिती सांगणार आहोत. दोन्ही मॉडेल्सचे काही फायदे आणि काही तोटे आहेत, त्यामुळे फायदे-तोटे समजून घेतल्याशिवाय नवीन फोन खरेदी करण्याची घाई करू नका.

दिसायला स्टायलिश आणि उत्तम फीचर्स असणारा स्मार्टफोन हातात असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळेच कंपन्याही ग्राहकांसाठी स्टायलिश लूक असलेले फोन बनवत आहेत. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे कर्व्ड डिस्प्ले फोन आणि फ्लॅट स्क्रीन मोबाइल फोन बाजारात उपलब्ध आहेत. आता अशा परिस्थितीत इथे प्रश्न पडतो की, शेवटी फ्लॅट स्क्रीन फोन विकत घ्यायचे की कर्व्ह्ड स्क्रीन फोन? येथे समजून घेण्याची गरज आहे की, कोणता फोन खरेदी करणे फायदेशीर सौदा आहे आणि का? याचविषयी आम्ही आज माहिती देणार आहोत.

नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी दोन्ही फोनचे फायदे-तोटे समजून घ्यावे लागतील. फ्लॅट आणि कर्व्ह्ड दोन्ही डिस्प्लेचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत, आपण आपल्या गरजा आणि बजेटनुसार योग्य डिस्प्ले असलेला फोन निवडू शकता.

फ्लॅट स्क्रीन फोनचे फायदे-तोटे

  1. टेम्पर्ड ग्लास फ्लॅट डिस्प्लेवर लावणे सोपे आहे आणि ते सुरक्षित आहे कारण या स्क्रीनवर बबल येण्याची शक्यता कमी आहे.
  2. फ्लॅट डिस्प्ले असलेले फोन सामान्यत: कर्व्ह्ड डिस्प्ले असलेल्या फोनपेक्षा कमी महाग असतात.
  3. फ्लॅट डिस्प्ले असलेले फोन कर्व्ह्ड डिस्प्लेपेक्षा कमी आकर्षक दिसू शकतात.
  4. वक्र डिस्प्लेच्या तुलनेत फ्लॅट डिस्प्लेवर व्हिडिओ पाहण्याचा अनुभव फारसा मजेदार नसतो.

कर्व्ड स्क्रीन डिस्प्लेचे फायदे-तोटे

  1. कर्व्ह्ड डिस्प्ले असलेले फोन दिसायला खूपच आकर्षक असतात.
  2. कर्व्ह्ड डिस्प्ले असलेल्या फोनवर व्हिडिओ पाहण्याचा अनुभव खूप छान असतो.
  3. कर्व्ह्ड डिस्प्ले असलेले फोन सामान्यत: फ्लॅट डिस्प्ले असलेल्या फोनपेक्षा महाग असतात.
  4. टेम्पर्ड ग्लास कर्व्ह्ड डिस्प्लेवर लावणे अवघड आहे आणि ते सहज पणे येऊ शकते.

स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी फ्लॅट स्क्रीन फोन किंवा कर्व्ह्ड डिस्प्ले असलेला फोन, यापैकी कोणता खरेदी करण्यासाठी चांगला, हे वरील माहितीच्या आधारे समजून घेतल्यास तुम्हाला चांगला फोन घेता येईल.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा