तुमच्या फोनची बॅटरी ही लवकर संपते का? तर सेटिंगमध्ये करा हे बदल

तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर काही चुकांमुळे त्याची बॅटरी कालांतराने लवकर संपू लागते. यामागे काही गोष्टी आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी कधीच लवकर संपणार नाही.

तुमच्या फोनची बॅटरी ही लवकर संपते का? तर सेटिंगमध्ये करा हे बदल
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 5:24 PM

Smartphone Battery : स्मार्टफोन आता आपल्या आयुष्यातील अतिमहत्त्वाचा भाग बनला आहे. आता अनेक महत्त्वाची कामे ही स्मार्टफोनवरच होऊ लागली आहेत. स्मार्टफोन आता फक्त कॉलिंग पुरता मर्यादीत राहिलेला नाही. जेवन ऑर्डर करण्यापासून ते बँकेची कामे करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर होत आहे. पण हाच स्मार्टफोन वापरताना अनेकांना मोठी समस्या म्हणजे ती म्हणजे बॅटरीची. कारण फोनची बॅटरी संपण्याची समस्या आता खूप सामान्य आहे.

काही गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या फोनची बॅटरी संपण्याची समस्या कशी दूर केली जावू शकते याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण तुम्हाला बॅटरी संपण्याची अनेक कारणे माहित आहेत का. आपण त्याचा सहसा अजिबात विचार करत नाही.

स्क्रीन ब्राइटनेस : अनेकदा आपण याकडे लक्ष देत नाही.पण फोनच्या उच्च स्क्रीन ब्राइटनेसमुळे बॅटरी लवकर संपते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फोनची ब्राइटनेस कमी करून बॅटरी वाचवू शकता.

बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स: अनेकदा आपण याकडे लक्ष देत नाही आणि ॲपवरून थेट होम पेजवर जातो. यामुळे अनेक ॲप्स तुमच्या फोनची बॅटरी खात असतात. कारण तुम्ही ते वापरत नसले तरीही हे ॲप्स बॅकग्राउंडमध्ये सक्रिय राहतात.

सोशल मीडिया ॲप्स, मेल सिंकिंग, लोकेशन सर्व्हिस आणि बॅकग्राउंडमध्ये चालणारे गेम ॲप्स मोठ्या प्रमाणात बॅटरी संपवतात. त्यामुळे गरजेचे ॲप्स आहेत तेच तुम्ही मोबाईलमध्ये ठेवावीत.

अनेकदा लोकेशन ऑन असल्याने देखील बॅटरी लवकर संपते. GPS, हवामान संदर्भातील ॲप, फिटनेस ट्रॅकर सारखी ॲप्स बॅटरी लवकर संपवतात.

ब्लूटूथ, वाय-फाय आणि सेल्युलर डेटा चालू ठेवणे: ब्लूटूथ, वाय-फाय, आणि सेल्युलर डेटा सारख्या सेवा जर तुम्ही सतत चालू ठेवत असतील तरी देखील तुमची बॅटरी लवकर संपते.

समस्यांवर मात कशी करावी

बॅटरी लवकर संपत असेल तर तुम्ही Settings > Battery > Battery Usage वर जाऊन. तुम्ही iOS वापरकर्ते असल्यास सेटिंग्ज > बॅटरी पर्यायावर जा. बॅटरी सेव्हर मोड चालू करा तुमचा स्मार्टफोन बॅटरी-सेव्हर किंवा पॉवर-सेव्हिंग मोडसह येतो. बॅटरीचे आयुष्य वाढविण्यात मदत करण्यासाठी ही सेटिंग समाविष्ट करा. आम्ही तुम्हाला सांगतो की बॅटरी सेव्हिंग मोड तुमच्या फोनमधील बॅटरीचा वापर व्यवस्थापित करू शकतो.

बॅटरी पातळी 20 ते 80% दरम्यान ठेवा

तुमच्या फोनची बॅटरी लेव्हल 20-80% च्या दरम्यान ठेवल्याने बॅटरीचे आरोग्य चांगले राहते. तुमची बॅटरी 20% पर्यंत पोहोचल्यावरच चार्जिंग करणे. बॅटरीचे नुकसान टाळण्यासाठी ती 80% पर्यंतच चार्ज करणे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....