
Elon Musk Grok AI मध्ये एक नवीन स्पाइसी मोड समाविष्ट करण्यात आला आहे, परंतु हा मोड लवकरच मोठा गोंधळ निर्माण करू शकतो कारण हा नवीन मोड यूजर्सकडून मिळालेल्या टेक्स्ट प्रॉम्प्टवरून ॲडल्ट थीम व्हिडिओ तयार करत आहे. हे नवीन साधन निश्चितच जनरेटिव्ह एआयच्या सीमा ओलांडत आहे, परंतु या फीचरच्या आगमनाने नियंत्रण आणि गैरवापराबद्दल चिंता देखील निर्माण केली आहे.
कोणासाठी उपलब्ध हे फीचर ?
एलोन मस्कच्या xAI ने Grok Imagine मध्ये एक नवीन स्पाइसी मोड फीचर जोडले आहे, हे फीचर X (ट्विटर) च्या iOS ॲपवर प्रीमियम प्लस आणि सुपरग्रोक सबस्क्राइबर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरबद्दल बरीच चर्चा आहे कारण हे टूल प्रौढांसाठी कंटेंट तयार करत आहे. म्हणजे अडल्ट कंटेट तयार करतं. या फीचरचा उपयोग करण्यसाठी कंपनी SuperGrok यूजर्सकडून दरमहीना 700 रुपये आकारते.
स्पायसी मोड म्हणजे काय ?
Spicy Mode हा यूजर्सना फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट देऊन बोल्ड कंटेंट तयार करण्याची परवानगी देतो. हे टूल 15 सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ तयार करू शकते ज्यामध्ये प्रौढांसाठी व्हिज्युअल आणि नैसर्गिक ऑडिओ देखील आहे. कंपनीने या टूलवर काही निर्बंध घातले असले तरी, हे टूल असे काही दृश्यं तयार करतं जे कंपनीने लावलेल्या फिल्टर्सनाही बायपास करतात.
कसं झालं उघड ?
xAI कर्मचारी Mati Roy यांनी काही काळापूर्वी X (ट्विटर) वर पोस्ट केले होते, ज्यामध्ये त्यांनी या वैशिष्ट्याचा उल्लेख केला होता आणि म्हटले होते की हे साधन न्यूडिटी कंटेंट जनरेट करू शकतं. ही पोस्ट नंतर हटवली गेली असली तरी तोपर्यंत ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती.
या टूलला आधी प्रॉम्प्ट द्यावा लागतो आणि नंतर हे टूल काही सेकंदात अनेक इमेजेस तयार करते, या इमेजेस ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये रूपांतरित करता येतात. पण अनकॅनी व्हॅली इफेक्ट अजूनही त्यात दिसतो, म्हणजेच मानवी चेहरे कार्टूनसारखे दिसतात.