Elon Musk Twitter : ट्विटरच्या चिमणीचा नवीन अवतार, अजून होणार अनेक बदल

Elon Musk Twitter : ट्विटरची चिमणी लवकरच रंग सोडणार आहे. मालक एलॉन मस्कनेच याविषयीची चर्चा छेडली आहे. पण या मागची कारणं काय आहेत? अजून बरेच बदल होऊ घातले आहे. काय आहेत हे बदल..

Elon Musk Twitter : ट्विटरच्या चिमणीचा नवीन अवतार, अजून होणार अनेक बदल
| Updated on: Jul 23, 2023 | 2:06 PM

नवी दिल्ली | 23 जुलै 2023 : बदल निसर्गाचा नियम आहे. जगातील अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) याला हा नियम लागू आहे. सातत्याने नवीन काही करणे हा त्याचा पिंड आहे. Tesla आणि SpaceX चे सीईओ एलॉन मस्क हा त्याच्या हटके स्वभावासाठी ओळखल्या जातो. ट्विटरचा हा निर्णय गळ्याशी आला आहे. गेल्या वर्षी ट्विटरचा व्यवसाय त्याने हाती घेतला. त्याच्याच नाही तर कर्मचाऱ्यांच्या आणि युझर्सच्या डोक्याला एकदम ताप झाला. त्याने तुफान बदल केले. त्याचा मोठा फटका बसला. एलॉन मस्क याचे प्रयोग अजूनही कमी झालेले नाही. ट्विटर आणि ट्विटरची चिमणी लवकरच रंग सोडणार आहे. मालक एलॉन मस्कनेच याविषयीची चर्चा छेडली आहे. पण या मागची कारणं काय आहेत? अजून बरेच बदल होऊ घातले आहे. काय आहेत हे बदल..

टिट्वरचा पोल

ट्विटर सातत्याने मोठे बदल होत आहेत. एलॉन मस्कने ट्विट करुन याविषयीचा एक पोल टाकला आहे. ट्विटरचा डिफॉल्ट रंग पांढरा करण्यासंबंधी त्याने ट्विट केले. हा रंग काळा करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. त्यावेळी 76 टक्के लोकांनी ट्विटरचा मुळ रंग बदलून तो काळा करावा या बाजूने कौल दिला.

ट्विटरचा असा होईल कायापालट

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क याने ट्विटरचा डिफॉल्ट रंग बदलण्यासाठी ट्विट केले. लवकरच ट्विटर ब्रँडची पाठवणी होणार असून चिमणी पण उडेल, असा त्याने स्पष्ट केले.

लोगो तयार होणार

एलॉन मस्कने याने अजून एक ट्विट केले. त्यात त्याने आज रात्रीच एक शानदार लोगो तयार होईल आणि उद्या तो जगासमोर येईल, असे त्याने स्पष्ट केले. वर्ल्डवाईड हा लोगो लाईव्ह करण्यात येईल, असे त्याने स्पष्ट केले. एलॉन मस्कने ट्विट मध्ये एक फोटो पण शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की – Like This. या नवीन लोगोमध्ये ट्विटरच्या चिमणीचा रंग बदलल्याचे दिसून येते. तसेच पूर्वीच्या लोगोपेक्षा यामध्ये बदल झाल्याचे समोर येते.

कसा होता लोगो

आतापर्यंत ट्विटरची चिमणी पांढऱ्या रंगावर निळ्या रंगासह सजली होती. पण एलॉन मस्क आता ट्विटरची नजर उतरवणार आहे. त्यासाठी ब्लॅक बॅकग्राऊंडचा वापर करण्यात येईल. त्यावर निळ्या रंगाची चिमणी आता पांढऱ्या रंगाची होईल.


ट्विटरमध्ये झाला हा बदल, पण यासाठी लागेल पैसा

ट्विटर ताब्यात घेतल्यापासून मस्कने अनेक बदल केले. काही सेवांसाठी त्याने शुल्क आकारणी सुरु केली. त्यामुळे युझर नाराज झालेत. ब्लू टिकसाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली. युझरला जास्त मॅसेज करायचे असेल तर ट्विटर ब्लू सर्व्हिसचे सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागेल.