AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk : एलॉन मस्क याने गमावली इतकी संपत्ती, त्यात तर चंद्रयान-3 चे झाले असते 270 मिशन

Elon Musk : जगातील अब्जाधीश एलॉन मस्क याला मोठा फटका बसला आहे. त्याने एका फटक्यात मोठी संपत्ती गमावली. ही संपत्ती हरियाणा राज्याच्या बजेट इतकी आहे. त्याने एकाच दिवसात इतक्या अरब डॉलरची संपत्ती गमावली.

Elon Musk : एलॉन मस्क याने गमावली इतकी संपत्ती, त्यात तर चंद्रयान-3 चे झाले असते 270 मिशन
| Updated on: Jul 21, 2023 | 1:58 PM
Share

नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) याने एकाच दिवसात मोठी संपत्ती गमावली. त्याला मोठा फटका बसला. भारतातील हरियाणा राज्याच्या बजेट इतकी संपत्ती त्याने एकाच दिवसात गमावली. गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्क याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मेटाच्या थ्रेडने त्याचे टेन्शन वाढवले आहे. ट्विटरमधून कमाईसाठी त्याने केलेले कारनामे आता त्याच्या अंगलट आले आहे. ट्विटरचे वापरकर्ते घसरल्याने त्याचा जाहिरात व्यवसाय पण घसरला आहे. आता त्याची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाचे शेअर (Tesla Share) गडगडले आहेत. या सर्वांमुळे त्याच्या एकू्ण संपत्ती मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात विस्तारासाठी मस्क आता भारतात गुंतवणूकीचा प्रयत्न करत आहे.

20 अब्ज डॉलरचा फटका

एलॉन मस्क याला जवळपास 20 अब्ज डॉलरचा फटका बसला. भारतीय रुपयात ही रक्कम 1.66 लाख कोटी आहे. यामध्ये भारतातील हरियाणा या राज्याचे बजेट तयार होते. या आर्थिक वर्षातील एलॉन मस्कच्या नुकसानीच्या आकड्यापेक्षा ते किंचित जास्त आहे.

चंद्रयान मोहिमा राबवता येतील

हे नुकसान इतके जास्त आहे की, भारताचे चंद्रयान-3 सारखे 270 मिशन यामध्ये होऊ शकतात. टेस्लाच्या शेअरमध्ये एकाच दिवशी 10 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्यामुळेच एलॉन मस्क याच्या संपत्तीत मोठी घसरण दिसून आली. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपयांचा खर्च आला होता. मस्क यांचे नुकसान पाहता त्यात 270 मिशन राबविता आले असते.

टेस्लाच्या शेअरमध्ये घसरण का?

जवळपास 40 महिन्यानंतर टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या एका निर्णयाचा हा परिणाम आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या किंमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कंपनीच्या शेअरमध्ये 9.74 टक्क्यांची घसरण झाली आहे. हा शेअर सध्या 262.90 डॉलरवर आला आहे.

मोठी घसरण

टेस्लाच्या शेअरमध्ये एप्रिल 2020 नंतर सर्वात मोठी घसरण दिसून आली. त्यामुळे टेस्लाच्या किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. येत्या काळात टेस्लाच्या शेअरमध्ये मोठी घसरण येऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एलॉन मस्कला मोठा फटका

एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत मोठी घसरण झाली. एका झटक्यात त्याने 1.66 लाख कोटी रुपये गमावले. मस्क याची संपत्ती 234 अब्ज डॉलरपर्यंत खाली घसरली आहे. या वर्षात मस्कच्या संपत्तीत 97.4 अब्ज डॉलरची भर पडली होती. एका दिवसातील ही सातवी सर्वात मोठी घसरण असल्याचे ब्लूमबर्ग रिसर्चने स्पष्ट केले आहे.

हरियाणा राज्याचे वार्षिक बजेट

एका दिवसात 20 अब्ज डॉलरचे नुकसान होणे ही फार मोठी गोष्ट आहे. भारतातील एक डझन अशी राज्य आहेत, ज्यांचे वार्षिक बजेट 20 अब्ज डॉलरपेक्षा पण कमी असते. इतक्या संपत्तीत तर हरियाणा राज्याचे वार्षिक बजेट तयार होते. मस्क याच्या नुकसानीच्या आकड्यापेक्षा आर्थिक वर्ष 2023—24 मधील बजेट किंचित अधिक आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.