स्वस्त की ब्रँडेड? तुमच्या मोबाईलसाठी कोणता कव्हर आहे सर्वोत्तम?

आजकाल बाजारात अनेक प्रकारचे फोन कव्हर्स उपलब्ध आहेत. 100 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत त्यांची किंमत असते. अशा वेळी स्वस्त कव्हर निवडायचा की ब्रँडेड, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

स्वस्त की ब्रँडेड? तुमच्या मोबाईलसाठी कोणता कव्हर आहे सर्वोत्तम?
phone cover
| Edited By: | Updated on: Aug 05, 2025 | 5:45 PM

तुमच्या स्मार्टफोनसोबत मोबाइल कव्हर वापरणे आजकाल सामान्य झाले आहे. बाजारात 100 रुपयांपासून ते 6,000 रुपयांपर्यंतचे कव्हर्स उपलब्ध आहेत. अशा वेळी, कोणता कव्हर निवडायचा, याबद्दल अनेकदा गोंधळ होतो. महागड्या कव्हरवर इतके पैसे खर्च करणे योग्य आहे का? किंवा स्वस्त कव्हर वापरल्याने फोनचे नुकसान होते का? या प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

1. संरक्षणाचा मुद्दा (Protection)

स्वस्त आणि महागड्या कव्हरमधील सर्वात मोठा फरक संरक्षणाचा असतो. ब्रँडेड कंपन्यांचे कव्हर्स, जसे की Spigen, ESR, Ringke, Totem, हे खास ‘ड्रॉप टेस्टिंग’ (Drop Testing) करून बनवले जातात. यामुळे, तुमचा फोन चुकून उंचावरून पडला तरी खराब होण्याची शक्यता खूप कमी असते. ब्रँडेड कव्हर तुमच्या फोनसाठी एकाप्रकारे विमा सारखं काम करतं. ही सुरक्षितता स्वस्त कव्हर्समध्ये मिळत नाही.

2. फिटिंग आणि डिझाइन

ब्रँडेड कव्हर्स त्यांच्या अचूक फिटिंगसाठी ओळखले जातात. हे कव्हर्स फोनच्या प्रत्येक डायमेन्शन आणि सेन्सरचा विचार करून बनवलेले असतात. त्यामुळे, कोणताही सेन्सर, कॅमेरा किंवा मायक्रोफोन कव्हरखाली दबला जाणार नाही, याची खात्री असते. याउलट, स्वस्त किंवा नॉन-ब्रँडेड कव्हर्स वापरल्यास मायक्रोफोन झाकले जाण्याची शक्यता असते, ज्यामुळे बोलताना आवाजाची गुणवत्ता खराब होऊ शकते.

3. हीटिंगची समस्या

फोन खराब होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ‘हीटिंग’ फोन गरम झाल्यावर त्याच्या बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेकदा फोन गरम होण्याचं कारण चुकीचा कव्हर असू शकतं. जर कव्हरने फोनच्या उष्णता बाहेर पडण्याच्या जागा बंद केल्या, तर बॅटरी लवकर खराब होऊ शकते. ब्रँडेड कव्हर्स बनवणाऱ्या कंपन्या या गोष्टीची काळजी घेतात, तर स्वस्त कव्हर्समुळे हीटिंगची समस्या वाढू शकते.

कव्हरवर किती खर्च करावा?

बाजारात 6,000 रुपयांपर्यंतचे कव्हर मिळत असले, तरी इतके पैसे खर्च करणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या फोनच्या विमा किंमतीनुसार खर्च करू शकता. साधारणपणे, नवीन फोनचा विमा 2 ते 4 हजार रुपयांमध्ये मिळतो. त्यामुळे, जर तुम्हाला फोनचे आयुष्यभर संरक्षण हवे असेल, तर तुम्ही 1,000 ते 2,000 रुपयांपर्यंतच्या ब्रँडेड कव्हरवर खर्च करू शकता. या रेंजमध्ये तुम्हाला चांगले आणि टिकाऊ कव्हर मिळतात.