32MP चे दोन सेल्फी कॅमेरा असलेल्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मिळेल दमदार प्रोसेसर आणि फिचर्स, जाणून घ्या किंमत

Xiaomi कंपनीच्या या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये आहेत, चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊया की या हँडसेटमध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत आणि तो कोणत्या किंमतीत उपलब्ध आहे.

32MP चे दोन सेल्फी कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मिळेल दमदार प्रोसेसर आणि फिचर्स, जाणून घ्या किंमत
smartphone
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 2:17 PM

तुम्ही जर उत्तम प्रोसेसर आणि खास फिचर्स असलेला नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आजच्या लेखात अशा एका फोनची माहिती सांगितली आहे, ज्यामध्ये एक नाही तर दोन सेल्फी कॅमेरे आहेत. तर या फोनचे नाव आहे Xiaomi 14 Civi. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत व फिचर्स तसेच उपलब्धतेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

भारतात Xiaomi 14 Civi ची किंमत

शाओमीच्या या फोनचा 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 25% सवलतीनंतर तुम्हाला 44 हजार 999 रूपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच स्पर्धेच्या बाबतीत हा फोन या किंमतीच्या रेंजमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S24 FE 5G, रियलमी 16 प्रो+ 5G, ओप्पो रेनो15 5G आणि विवो V60 5G सारख्या मॉडेल्सशी जोरदार स्पर्धा करतो.

तसेच तुम्ही हा हँडसेट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून व फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

शाओमी 14 सिवीचे खास फिचर्स

या हँडसेटमध्ये 1.5K रिझोल्यूशन असलेला 6.55-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. तो HDR10+, 68‍ अब्ज रंग आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो. तसेच या फोनच्या स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 चा वापर केला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 प्रोसेसरचा वापर केला जातो. फोनमध्ये 4700 mAh क्षमतेची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली असून, ती 67 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 50MP टेलीफोटो सेन्सर आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आहे. सेल्फीसाठी यामध्ये एक नव्हे तर दोन 32-मेगापिक्सलचे सेन्सर कॅमेरा उपलब्ध आहेत.

Follow Us