AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Realme GT Neo 2 वर 3000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Realme ही स्मार्टफोन निर्माती कंपनी Flipkart वर सुरु असलेल्या बिग बचत धमाल सेल (Big Bachat Dhamaal sale) मध्ये सहभागी होत आहे. म्हणजेच या सेलदरम्यान Realme स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे.

Realme GT Neo 2 वर 3000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Realme Gt Neo 2 स्मार्टफोन
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 1:32 PM
Share

मुंबई : Realme ही स्मार्टफोन निर्माती कंपनी Flipkart वर सुरु असलेल्या बिग बचत धमाल सेल (Big Bachat Dhamaal sale) मध्ये सहभागी होत आहे. म्हणजेच या सेलदरम्यान Realme स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. येथे आम्ही फ्लिपकार्टवर लाईव्ह होणाऱ्या सर्व डीलपैकी एका जबरदस्त फोन डीलबद्दल सांगत आहोत. Flipkart ने Realme GT Neo 2 वर एक शानदार डील सादर केली आहे. हा एक प्रीमियम फोन आहे जो गेल्या वर्षी लॉन्च झाला होता. तुम्ही आता Realme GT Neo 2 खरेदी केल्यास त्यावर 3,000 रुपयांची सूट मिळेल. (Flipkart Big Bachat Dhamaal sale live : 3000 rupees discount on Realme GT Neo 2)

Flipkart वरील हॉट डील म्हणजे तुम्ही Realme GT Neo 2 साठी ऑनलाइन पेमेंट केल्यास, तुम्हाला 3,000 रुपयांची सूट मिळेल. या डीलमुळे तुम्ही या फोनचे बेस मॉडेल 28,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता, जे स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या या मॉडेलची मूळ किंमत 31,999 रुपये इतकी आहे. त्याचप्रमाणे, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपयांऐवजी 32,999 रुपये असेल.

कसा आहे Realme GT NEO2?

Realme GT NEO2 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरवर चालणाऱ्या कोणत्याही स्मार्टफोनमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. Realme GTNEO2 हा डायमंड थर्मल-जेल वापरण्यात आलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. त्यात 20% डायमंड डस्ट असते, कारण हिरा हा इतर मटेरियलपेक्षा उत्तम थर्मल कंडक्टिव्ह मटेरियल आहे, ज्यामुळे 50% अधिक हीट ट्रान्सफर होते. या विशिष्ट्यामुळे हा फोन गेमिंगसाठी उत्तम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Realme GT NEO 2 स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरसह 4 Kryo 585 CPU द्वारे समर्थित आहे, जे 3.2Ghz वर परफॉर्म करते. फोटोग्राफीसाठी यामध्ये सर्वोत्तम कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रत्येक क्षण कॅप्चर करण्यासाठी, डिव्हाइसमध्ये 64 एमपी मेन कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सज्ज आहे.

रियलमी जीटी नियो 2 चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 2 मध्ये 6.62-इंच सुपर AMOLED डिस्प्ले 120hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 92.6 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि 600 हर्ट्ज सॅम्पलिंग रेट, HDR10+ देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 12GB पर्यंत RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. यात 7GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील समाविष्ट आहे.

इतर बातम्या

नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

(Flipkart Big Bachat Dhamaal sale live : 3000 rupees discount on Realme GT Neo 2)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.