AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोबोल्टचा ANC सपोर्ट असलेले स्वस्त इअरबड्स लाँच, एका चार्जवर मिळेल 75 तासांपर्यंत बॅटरी लाईफ

नवीन इअरबड्स खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही 1500 रुपयांपर्यंतच्या किंमत रेंजमध्ये नवीन इअरबड्स शोधत असाल, तर गोबोल्टने या श्रेणीमध्ये ANC सपोर्टसह नवीन टेनेट प्रो इअरबड्स लाँच केले आहेत. चला तर मग या नवीन इअरबड्सची किंमत जाणून घेऊयता.

गोबोल्टचा ANC सपोर्ट असलेले स्वस्त इअरबड्स लाँच, एका चार्जवर मिळेल 75 तासांपर्यंत बॅटरी लाईफ
goboultImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jul 16, 2026 | 3:24 PM
Share

गोबोल्ट कंपनीने टेनेट प्रो हे ट्रू वायरलेस स्टिरिओ इअरफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे नवीनतम इअरबड्स 32dB ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि एकूण 75 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफसह येतात. यामध्ये क्वाड मायक्रोफोन एन्व्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन, ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आणि फास्ट चार्जिंगची सुविधा देखील आहे. हे इअरबड्स ग्राहकांसाठी खूप कमी किमतीत लाँच करण्यात आले आहेत आणि सुरूवातीची ऑफर म्हणून त्यावर 200 रूपयांची सूट देखील मिळेल.

गोबोल्ट टेनेट प्रो किंमत

या नवीन इअरबड्सची किंमत भारतात 1 हजार 699 रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. मर्यादित कालावधीच्या लाँच ऑफरचा भाग म्हणून हे इअरबड्स तुम्ही 1 हजार 499 मध्ये खरेदी करता येतील. हे बड्स फ्रॉस्ट व्हाइट, क्रिमसन रेड आणि ऑलिव्ह ग्रीन या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असतील. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त हे नवीन इअरबड्स फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि मिंत्रावरून खरेदी करता येतील.

गोबोल्ट टेनेट प्रो वैशिष्ट्ये

या नवीनतम इअरबड्समध्ये 13 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत आणि ते AAC व SBC ऑडिओ कोडेक्सना सपोर्ट करतात. यामध्ये 32dB ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन असून कॉल दरम्यान बाहेरील आवाज कमी करण्यासाठी चार मायक्रोफोन्सचा वापर केला जातो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.4 आणि ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे. हे इअरफोन्स अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसेससोबत सुसंगत आहेत.

याव्यतिरिक्त या इअरबड्समध्ये 45ms कमी लेटन्सी असलेला कॉम्बॅट गेमिंग मोड, एआय व्हॉइस असिस्टंट सपोर्ट आणि गोबोल्ट अॅम्पॲप (GoBoult AmpApp) समाविष्ट आहे, जे कस्टम EQ, प्रीसेट साउंड मोड्स आणि इतर समर्थित नियंत्रणे प्रदान करते. कंपनीचा दावा आहे की चार्जिंग केससह टेनेट प्रो 75 तासांपर्यंतचा प्लेबॅक देऊ शकतात. हे इअरबड्स यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात, मात्र कंपनीने बॅटरीची क्षमता किंवा चार्जिंगचा वेग जाहीर केलेला नाही.

यात कंपनीचे ऑर्बिट कॅप्सूल डिझाइन, फ्रॉस्टव्ह्यू शेल, प्रिझम कट पॉवरव्हॉल्ट आणि एएनसी इन्सिग्निया आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार अधिक सुरक्षित फिटसाठी या इअरबड्समध्ये लिडार-मॅप्ड अर्गोनॉमिक डिझाइन, व्हॅक्यूम लॉक इअरशेल्स, इलिप्टिकल इअर टिप्स आणि कॅप्सूल-आकाराचा स्टेम वापरण्यात आला आहे. या इअरबड्सना स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी IPX5 रेटिंग देखील मिळाले आहे.

Follow Us
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा