
आताच्या आधुनिक युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. तसेच सर्वांचे काम हे स्मार्टफोनवरून होत असते. ऑनलाईन पद्धतीने आपण फोनद्वारे काम करतो. तर अनेक वेळा आपण गूगलच्या माध्यमातून अनेक माहिती सर्च करत असतो. मुलांच्या अभ्यासापासून ते ऑफिस कामांपर्यंत सर्व माहिती गूगल देत असतं. यासाठी गुगलचे Circle to Search फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरते. पण युजर्सच्या सोयीसाठी गुगल हे फिचर आणखी चांगले करण्याचा विचार करत आहे. लवकरच गुगल त्यांच्या सर्कल टू सर्च फीचरचे इंटरफेस बदलणार आहे. या अपडेटनंतर तुमचा गुगल वापरण्याचा अनुभव बदलेल. याचा इंटरफेस पूर्वीपेक्षा सोपा असेल. हे फीचर बदलल्यानंतर कसं काम करेल आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
गुगल लेन्स आयकॉन हटवण्यात आला आहे. हे सध्या गुगलच्या ‘Circle to Search’ UI मध्ये उपलब्ध आहे. नव्या डिझाइनमध्ये टेक्स्ट ट्रान्सलेशन, गाणं सर्च आणि मायक्रोफोन आयकॉन थेट टेक्स्ट फिल्डच्या आत दिसणार आहे. यामुळे युजर्सना नवीन फिचर्स ॲक्सेस करणे सोपे होणार आहे.
जेव्हा Circle to Search सक्रिय असते, तेव्हा संपूर्ण स्क्रीन एकाच एलिमेंट्सच्या रूपात वरच्या दिशेने सरकते. अशातच तुम्हाला स्क्रीन बंद करायचे असेल तर पॅनेल खाली करून बंद केले जाऊ शकते.
नव्या डिझाइनमध्ये स्क्रीनवर वेगवेगळे आयकॉन आणि एलिमेंट्स विखुरलेले दिसत नाहीत. ज्यामुळे नवीन इंटरफेस अधिक मॅनेज्ड दिसतो.
सध्या सर्च करण्यासाठी या सर्कलच्या नवीन इंटरफेसवर गुगलची टेस्टिंग सुरू आहे. कंपनी लवकरच नवीन इंटरफेस आणू शकते.
गुगलच्या नव्या डिझाइनमुळे व्हिज्युअल एक्सपीरियंस तर सुधारेलच, शिवाय हे फीचर वापरणंही सोपं होणार आहे. गुगलची ही चाचणी यशस्वी ठरल्यास तुम्हाला लवकरच पूर्वीपेक्षा चांगले सर्कल टू सर्च फीचर मिळणार आहे. ज्याचा वापर केल्याने तुमचा अनुभव बदलेल.
Circle to Search हे व्हिज्युअल एआय टूल आहे. हे फीचर वापरण्यासाठी फोनचे होम बटन किंवा नेव्हिगेशन बार दाबा आणि धरून ठेवा. पुढे, स्क्रीनवर तुम्हाला ज्या ऑब्जेक्टबद्दल शोधायचे आहे त्यांना सर्च करा . तसेच गुगल असिस्टंट, गुगल लेन्स आणि गुगल ट्रान्सलेट सारखे फिचर्सही तुम्ही वापरू शकता.