AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गूगल क्रोमचा मोठा निर्णय! ऑगस्टपासून ‘या’ मोबाईलमध्ये चालणार नाही Chrome ब्राऊजर

गूगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही विशिष्ट अँड्रॉइड व्हर्जन्सवर चालणाऱ्या मोबाईल फोनवर आता Chrome चे अपडेट्स किंवा नवीन फिचर्स मिळणार नाहीत. त्यामुळे तुमचाही फोन या यादीत आहे का, हे एकदा नक्की तपासा.

गूगल क्रोमचा मोठा निर्णय! ऑगस्टपासून 'या' मोबाईलमध्ये चालणार नाही Chrome ब्राऊजर
Google chromeImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jul 01, 2025 | 3:33 PM
Share

गूगलने आपल्या प्रसिद्ध वेब ब्राऊझर Chrome संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2025 पासून Android 8 (Oreo) आणि Android 9 (Pie) या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या मोबाईल डिव्हाइसेससाठी Chrome चं सपोर्ट बंद होणार आहे. याचा अर्थ असा की, या अँड्रॉइड व्हर्जन्सवर Chrome ला ना कोणतेही अपडेट्स मिळतील, ना सुरक्षा पॅचेस, ना नवीन फीचर्स.

कोणते डिव्हाइस होणार प्रभावित?

जर तुम्ही अजूनही Android 8 किंवा Android 9 वर चालणारा मोबाईल वापरत असाल आणि Google Chrome वापरत असाल, तर तुम्हाला लवकरात लवकर फोन अपडेट करण्याची गरज आहे. Chrome 139 चा नवीन अपडेट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 ऑगस्ट 2025 च्या सुमारास रिलीज होणार आहे. त्यानंतर फक्त Android 10 आणि त्यापेक्षा वरच्या व्हर्जन्सवर चालणाऱ्या डिव्हाइसेससाठीच Chrome चे अपडेट्स मिळतील.

Android 8 किंवा 9 वापरणाऱ्या यूजर्ससाठी Chrome 138 हे अंतिम वर्जन ठरेल. म्हणजे यानंतर कोणतीही सुधारणा, सुरक्षा अपग्रेड्स किंवा नवीन फिचर्स मिळणार नाहीत.

काय परिणाम होणार आहे?

Chrome लगेचच काम करायचं थांबवणार नाही. पण त्याला भविष्यात कोणतेही अपडेट्स न मिळाल्याने बग्स, सिक्युरिटी लूपहोल्स आणि डेटा रिस्क वाढू शकते. विशेषतः जे वापरकर्ते इंटरनेटवर बँकिंग, ईमेल्स किंवा अन्य संवेदनशील काम करतात त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकतं.

गूगलने आपल्या अधिकृत सपोर्ट पेजवर सल्ला दिला आहे की, “यूजर्सनी Android 10 किंवा त्यावरील वर्जनमध्ये लवकरात लवकर अपग्रेड करावं, जेणेकरून त्यांना Chrome चा पूर्ण अनुभव मिळत राहील.”

किती युजर्सवर होईल परिणाम?

एप्रिल 2025 पर्यंतच्या डेटा नुसार, Android 9 अजूनही सुमारे 6% अँड्रॉइड युजर्स वापरत आहेत, तर Android 8 आणि 8.1 मिळून 4% लोक अजूनही त्या वर्जनवर आहेत. याचा अर्थ, सुमारे १०% अँड्रॉइड युजर्स यापुढे Chrome अपडेट्सपासून वंचित राहतील.

आता काय करावं?

जर तुमचं डिव्हाइस Android 10 किंवा त्यावर अपग्रेड होण्यायोग्य असेल, तर आता तो योग्य वेळ आहे. जुन्या Chrome ब्राऊझरमध्ये इंटरनेट सर्फिंग करताना तुमचा डेटा सुरक्षित राहीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे तुमचं डिव्हाइस जर सपोर्ट करत असेल, तर आजच सिस्टम अपडेट तपासा.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.