Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Google Mapच्या नवीन फीचरमुळे प्रवास अधिक सोपा! कसं वापरायचं नवं फिचर? जाणून घ्या

आता कुठेही प्रवास करायचा म्हटले की, सर्वात आधी गुगल मॅप ची मदत घेतली जाते. ‘गूगल मॅप’ मुळे पत्ता माहीत नसला तरी, आपल्याला कमी वेळेत, अचूक जागेवर पोहचता येते. गुगल मॅप्सने आता एक नवीन फीचर जारी केले आहे. या नव्या फिचरद्वारे आपला प्रवास अधिक सुकर आणि सोपा होणार आहे.

‘Google Mapच्या नवीन फीचरमुळे प्रवास अधिक सोपा! कसं वापरायचं नवं फिचर? जाणून घ्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 5:44 PM

गुगल मॅपच्या नव्या फीचरमुळे (Update Feature) आपल्याला प्रवासादरम्यान किती टोल नाके (Toll Plaza) येतील, तिथं किती टोल भरावा लागेल याची माहिती आधीच युजर्सला मिळणार आहे. यासह टोल नसलेल्या दुसऱ्या मार्गाचा (Toll Free Route) पर्याय देखील गुगल मॅप युजर्सला सुचविणार आहे. नवीन फीचरमध्ये, प्रवासादरम्यान, रस्त्याला लागणाऱ्या टोलबाबत माहिती दिली जाणार आहे. या नव्या फीचरच्या मदतीने गुगल मॅप्स युजर्सना त्यांच्या प्रवासाची प्लँनिंग अधिक उत्तमरित्या करता येईल. गूगल मॅप्समध्ये देण्यात आलेल्या या नवीन फीचर मध्ये रस्त्यात लागणाऱ्या टोल-किंमतीची माहिती दिली जाईल. स्थानिक टोल प्राधिकरणाकडून टोलशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे. यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी टोलचा खर्च किती येऊ शकतो याचा हिशेब आधीच करता येणार आहे. यामुळे गूगल मॅप्स युजर्सला रोड ट्रिपच्या प्लॅनिंगमध्ये खूप मदत होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

टोल नसलेल्या पर्यायी रस्त्यांची माहिती

यामध्ये गुगल मॅप तुम्हाला टोल नसलेल्या रस्त्यांचीही माहिती देईल. याच्या मदतीने तुम्ही टोल न भरता, किंवा कमी टोल टॅक्स देऊन दुसऱ्या रस्त्याचा वापर करून पैसे वाचवू शकता. टोल दर आणि मार्गासह गुगल मॅप्सवर टोलमुक्त मार्ग देखील मॅपमध्ये दर्शविण्यात येईल.

कसे वापरणार नवे फीचर

यासाठी गुगल मॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या थ्री-डॉटवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला रूट पर्याय निवडून त्या मार्गाचा वापर करता येणार आहे. येत्या महिन्याभरात Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी ही सुविधा वापरता येईल. भारत, यूएसए, जपान आणि इंडोनेशियामधील सुमारे 2000 टोल असणाऱ्या रस्त्यांसाठी हा पर्याय असून येत्या काळात हे फीचर इतर देशांमध्येही सुरु होईल.

प्रवासाच्या वेळे बाबतही अचूक माहिती

गुगल मॅपवर येत्या काही आठवड्यात हे फीचरचा वापर सुरू होणार असून, ट्राफिक लाईट, स्टॉप साईन, बिल्डिंग आउट लाईन, रस्त्यांची रुंदी अशा अनेक गोष्टीही दिसणार आहेत. यासह iPhone आणि iPad युजर्ससाठी एक नवीन Widget घेऊन येणार आहे. यामुळे युजर्संना एखाद्या ठिकाणी पोहचण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती आधीच घेता येईल.

इतर बातम्या

जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी – उद्धव ठाकरे

ठाण्यात भाजप-शिवसेनेला खिंडार; मयुर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

विक्रांतसाठी ज्या दलालाने पैसे खाल्ले, तुम्ही त्याची बाजू घेता, मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांचा खरपूस समाचार

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.