Google Play Store : अपडेट करा नाहीतर काढून टाकू, गुगल प्ले स्टोअरची अ‍ॅप्स कंपन्यांना सूचना, 15 लाखांहून अधिक अ‍ॅप काढणार

| Updated on: May 14, 2022 | 5:45 PM

अ‍ॅपल आणि गुगलने सर्व डेव्हलपरना नोटीस पाठवली आहे की जे अ‍ॅप अपडेट केले जात नाहीत ते अ‍ॅप स्टोअरमधून काढून टाकलं जाईल.

Google Play Store : अपडेट करा नाहीतर काढून टाकू, गुगल प्ले स्टोअरची अ‍ॅप्स कंपन्यांना सूचना, 15 लाखांहून अधिक अ‍ॅप काढणार
गुगल प्ले स्टोअर
Image Credit source: social
Follow us on

मुंबई :  या वर्षाच्या सुरुवातीला अ‍ॅपल (Apple) आणि गुगलनं (Google) कंपन्यांना अ‍ॅपच्या अपडेटबद्दल सूचना दिली होती. अ‍ॅप (App) लवकरात लवकर अपडेट करुन घ्या, असं गुगलने सुचित केलेलं असताना देखील याकडे दुर्लक्ष्य करण्यात आलं. अ‍ॅपल आणि गुगलने सर्व डेव्हलपरना नोटीस पाठवली आहे की जे अ‍ॅप अपडेट केले जात नाहीत ते अ‍ॅप स्टोअरमधून काढून टाकलं जाईल. आता Pixalate चा अहवाल सांगतो आहे की Apple च्या App Store आणि Google च्या Play-Store वरील जवळपास 30 टक्के अ‍ॅप्स काढून टाकले जाऊ शकतात. या अहवालानुसार सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 1.5 दशलक्ष अ‍ॅप्स कायमचे बॅन किंवा काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांपासून अपडेट नाही

Google आणि Apple ने असे सर्व अ‍ॅप्स स्टोअरमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वर्षानुवर्षे कोणतेही अपडेट मिळालेले नाही. अपडेट मिळत नसलेल्या अ‍ॅप्समध्ये एज्युकेशन, रेफरन्स आणि गेम्स कॅटेगरीमध्ये बरेच अ‍ॅप्स आहेत. यापैकी 3 लाख 14 हजार अ‍ॅप्स आहेत जे तात्काळ काढले जाण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांपासून या अ‍ॅप्सना कोणतेही अपडेट मिळालेले नाही. त्यात कोणतेही बदल करण्यात आले नाही. यामुळे अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

58 टक्के अ‍ॅप्स काढले

जवळपास 58 टक्के अ‍ॅप्स अ‍ॅप स्टोअरमधून आणि 42 टक्के अ‍ॅप्स प्ले-स्टोअरवरून काढून टाकण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. इशाऱ्यानंतर गेल्या 6 महिन्यांत 13 लाख अॅप्सअ‍ॅ अपडेट करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. अ‍ॅपलने सांगितलं आहे की ते अ‍ॅप स्टोअरमधून काढून टाकतील. परंतु कोणाच्या फोनमध्ये अ‍ॅप असल्यास ते त्याचा वापर करू शकतात. गुगलनेही गेल्या महिन्यात असंच विधान केलं होतं.

हे सुद्धा वाचा

नेमक्या अडचणी काय?

जे अ‍ॅप्स बऱ्याच काळापासून अपडेट होत नाहीत. त्यांच्यासोबत सुरक्षेचा मोठा धोका असतो. याशिवाय अ‍ॅप्समध्ये अपडेट न मिळण्याचीही शक्यता आहे. तसेच, एखाद्या विकासकाने त्याच्या अ‍ॅपसाठी कोणाकडूनही जाहिरात मागितल्यास त्याच्या अ‍ॅपचे नियमित अपडेट असणे आवश्यक आहे. गुगल प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप-स्टोअरवरून अपडेट न होणारे अ‍ॅप्स 1 नोव्हेंबरपासून हटवण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता जे अ‍ॅप अपडेट नाही त्यांना नारळ मिळणार इतकं मात्र निश्चित.