‘हिताची’चा नवा हायटेक एसी, मोबाईल अॅपवरुन ऑपरेट करता येणार

| Updated on: May 04, 2021 | 6:33 PM

या अ‍ॅप्लिकेशनचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपण घरातून निघताना एसी बंद करणे विसरल्यास, बाहेरूनही आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने बंद करू शकता. (Hitachi's new high-tech AC, you can operate from the mobile app)

हिताचीचा नवा हायटेक एसी, मोबाईल अॅपवरुन ऑपरेट करता येणार
सामान्य एसीपेक्षा इन्व्हर्टर एसीला ग्राहकांची अधिक पसंती
Follow us on

नवी दिल्ली : सध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येक इलेक्ट्रिक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन अत्याधुनिक सुविधा आणत आहे. यामध्ये एसी बनविणाऱ्या कंपन्याही मागे नाहीत. परवडणाऱ्या दरात एसी उपलब्ध करण्यासोबत नवीन टेक्नोलॉजीही आणत आहेत. हिताची या प्रसिद्ध एसी बनविणाऱ्या कंपनीने ‘एअर क्लाऊड होम’ ची सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा वाय-फाय असलेल्या एसीसाठी आहे ज्यात ‘स्मार्ट फेन्स’ वैशिष्ट्ये असतील. या एसीमध्ये व्हॉईस कमांडची सुविधा देखील देण्यात आली आहे, ज्यामध्ये लोक आवाजाने एसी बंद करण्यास किंवा सुरू करण्यास सक्षम असतील. हे अॅप्लिकेशन लॉन्च झाल्यानंतर हिताचीने एसीच्या क्षेत्रात आपली डिजिटल क्षमता आणखी वाढविली आहे. या अ‍ॅप्लिकेशनचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपण घरातून निघताना एसी बंद करणे विसरल्यास, बाहेरूनही आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने बंद करू शकता. (Hitachi’s new high-tech AC, you can operate from the mobile app)

हिताची एअर क्लाऊड होम एसी आपल्याला स्मार्टफोनच्या अॅपवरून चालवण्याची सुविधा देते. एसीमध्ये व्हॉईस कंट्रोलसाठी गुगल होम आणि अमेझॉन इको स्मार्ट स्पीकर्स देण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना एसी वापरण्यास सुलभ आणि सोयीस्कर करण्यात आली आहे. यापुढे एसी फक्त रिमोटद्वारे चालू आणि बंद केला जाणार नाही, परंतु त्याचे नियंत्रण थेट माणसांच्या हातात आले आहे. म्हणजेच, वापरकर्ता आवाजानेही एसी सुरू आणि बंद करु शकतो. रिमोटचे कामही कमी होत आहे कारण स्मार्टफोनवरून ऑपरेट करण्याची सुविधाही दिली जात आहे.

कमी बजेटमध्ये हायटेक एसी उपलब्ध

उच्च तंत्रज्ञानाच्या जगात ग्राहकांना नवीन सुविधांची आवश्यकता आहे. ग्राहक यासाठी पैसे खर्च करण्यास तयार आहेत. याची काळजी घेत हिताचीने आपल्या उत्पादनामध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडण्यास सुरवात केली आहे जेणेकरून ग्राहक समाधानी असतील. प्रोडक्टची किंमत ग्राहकांना परवडेल अशी असले पाहिजे हे देखील कंपनीने लक्षात ठेवले पाहिजे. परवडणाऱ्या किंमतीत प्रोडक्ट उपलब्ध करुन देणे हे मोठे आव्हान आहे.

हिताचीची 30 पेक्षा अधिक उत्पादने

विजेचा वापर कमी करणे, कुलिंग अधिक व्हावे आणि किंमत परवडणारी असावी या उद्देशाने हिताचीने 30 पेक्षा जास्त रुम्स एसी आणि 90 पेक्षा जास्त एसकेयू बाजारात आणले आहेत. या उत्पादनांमध्ये घर आणि व्यावसायिक दोन्ही जागा आहेत. हे कुलिंग प्रोडक्ट व्हिलामध्येही लावले जाऊ शकते. हिताची एअर क्लाऊड होम फिचर त्याच्या स्टायलिश इंटरफेससह कार्य करते. घरात बसविलेले हे एसी मोबाईल अ‍ॅपद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. हे वैशिष्ट्य एका अ‍ॅपमधून 20 वातानुकूलन युनिट ऑपरेट करू देते.

10 लोकांच्या हातात राहणार कंट्रोल

या एका अॅपद्वारे, कुटुंबातील 10 सदस्य एसी कनेक्ट आणि नियंत्रित करू शकतात. जर एखादी व्यक्ती एसी बंद न करताच बाहेर गेला तरीही काळजी करण्याची गरज नाही. मोबाईल अॅपच्या मदतीने एसी कोठूनही बंद केला जाऊ शकतो. मोबाइल अ‍ॅपमध्ये एक शॉर्टकट फिचर देण्यात आले आहे, जे बाहेरुन एसी बंद करू शकते. एकदा आपण आपल्या डिव्हाईसवरील बटण दाबले की, आपला एसी घरी बंद केला जाऊ शकतो. एसीमध्ये टायमर असतो जो एसीच्या गरजेनुसार सेट केला जाऊ शकतो. हिताची कंपनी भारताची उष्णता आणि थंडी लक्षात घेऊन एसी बनवते आणि बाजारात विकते. (Hitachi’s new high-tech AC, you can operate from the mobile app)

इतर बातम्या

PHOTO : कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर CT Scan ची गरज नाही, अन्यथा कॅन्सरचा धोका – AIIMS

कोरोनाविरुद्धच्या लढाईत Force Motors चा मदतीचा हात, 50 Trax Ambulance महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द