AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ऑनरचा Honor 10X Lite हा स्मार्टफोन 10 नोव्हेंबर रोजी जगभरात लाँच केला जाणार आहे.

Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 9:32 AM

मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ऑनर (Honor) चा Honor 10X Lite हा स्मार्टफोन 10 नोव्हेंबर रोजी जगभरात लाँच केला जाणार आहे. कंपनीने अधिकृतपणे या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. परंतु लिक्सद्वारे फोनचे लुक्स आणि काही फिचरबाबत माहिती मिळाली आहे. (Honor 10X Lite with 48 Megapixel quad rear camera setup and 5000mAh battery is all set to launch on november 10 )

Honor 10X लाईट हा स्मार्टफोन Honor 9X चं पुढील व्हर्जन आहे. हा फोन यावर्षी एप्रिल महिन्यात लाँच करण्यात आला होता. Honor 10X लाईट 10 नोव्हेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. कंपनीने एका रशियन वेबसाईटवर पंच होल कॅमेरा डिझाईन (Punch Hole Camera Design) शेअर केली आहे. यात माहिती देण्यात आली आहे की, हा फोन ग्रीन आणि पर्पल या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

लिक्सद्वारे माहिती मिळाली आहे की, हा स्मार्टफोन MagicUI 3.1 आधारित अँड्रॉयड 10 वर काम करेल. फोनमध्ये 6.67 इंचांचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1080×2400 पिक्सल रेजॉल्यूशन सपोर्टेड आहे. यामध्ये किरिन 710A प्रोसेसर दिला जाणार आहे. तसेच 4 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज स्पेस (इंटर्नल मेमरी) दिली जाईल. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल.

Honor 10X लाइटमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. उर्वरित तीन कॅमरे 8, 2 आणि 2 मेगापिक्सलचे असतील. फोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असेल. तसेच फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे, जी 22.5 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

संबंधित बातम्या

Amazon, Flipkart Sale : दिवाळीत खरेदी करा ‘हे’ पाच स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

(Honor 10X Lite with 48 Megapixel quad rear camera setup and 5000mAh battery is all set to launch on november 10 )

इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?.
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.