
ऑनर कंपनीने ऑनर एक्स6डी लाँच करून त्यांच्या बजेट 5जी लाइन अपमध्ये वाढ केली आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये लाँच झालेल्या ऑनर प्ले 60ए प्रमाणेच हे नवीन मॉडेल इतर बाजारपेठांमध्येही अशाच एंट्री-लेव्हल स्पेसिफिकेशन आलं आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये एचडी+ रिझोल्यूशन डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 50-मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5260mAh ची पॉवरफूल बॅटरी यांचा समावेश आहे. चला तर मग ऑनरचा हा 5जी सेगमेंटचा नवीन स्मार्टफोनची किंमत किती आहे आणि त्याचे फिचर्सही जाणून घेऊयात.
ऑनर एक्स6डी स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंचाचा एचडी+ एलसीडी स्क्रीन आहे.
चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी हा हँडसेट 6nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर वापरतो.
रॅम आणि स्टोरेज: या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे, सध्या फोन मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने एक्सपांडेबल स्टोरेजला सपोर्ट करतो की नाही याची पुष्टी झालेली नाही.
ऑपरेटिंग सिस्टम: हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित MagicOS 9 वर काम करतो.
कॅमेरा सेटअप: फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा सेन्सर आहे, जो प्रति सेकंद 30 फ्रेम्सच्या वेगाने 1080p वर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. सेल्फीसाठी, फोनच्या समोर 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर आहे.
बॅटरी क्षमता: फोनला पॉवर देण्यासाठी 5260 mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, परंतु सध्या जलद चार्जिंगबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ऑनर एक्स6डी किंमत
या नवीनतम स्मार्टफोनची किंमत UAE मध्ये AED 509 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 12 हजार 600 रूपये आहे आणि हा 4GB RAM/256GB स्टोरेज व्हेरिएंट आहे. हा फोन मिडनाईट ब्लॅक आणि ओशन सायन रंगात उपलब्ध आहे. भारतासह इतर देशांमध्ये या हँडसेटच्या लाँचिंगबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. डिझाइनच्या बाबतीत, Honor X6d मध्ये जाड बेझल आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी मध्यभागी वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे.