जगभरातील बर्‍याच भागांत हॉटस्टार, सोनीलिव्ह आणि झोमॅटो डाऊन, युजर्सला नाहक मनस्ताप

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठ वाजता ऑनलाईन प्लॅटफॉर्म डाऊन झाले. त्याच वेळी केवळ 5 मिनिटातच 3 हजार लोक एकट्या झोमॅट्योचा एक्सेस मिळवू शकले नाहीत.

जगभरातील बर्‍याच भागांत हॉटस्टार, सोनीलिव्ह आणि झोमॅटो डाऊन, युजर्सला नाहक मनस्ताप
नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी कंपनीने उचलले ‘हे’ पाऊल
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 12:31 AM

नवी दिल्लीः हॉटस्टार, सोनीलिव्ह आणि फूड अ‍ॅप झोमॅटो यांसारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जगातील बर्‍याच भागांत डाऊन झालेत. 22 जुलै रोजी म्हणजे गुरुवारी रात्री जगभरातील बर्‍याच वापरकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागलाय. Akamai वेब इन्फ्रास्ट्रक्चर बंद झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचं सांगितलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठ वाजता ऑनलाईन प्लॅटफॉर्म डाऊन झाले. त्याच वेळी केवळ 5 मिनिटातच 3 हजार लोक एकट्या झोमॅट्योचा एक्सेस मिळवू शकले नाहीत.

झोमॅटो, अॅमेझॉन आणि पेटीएम यांसारखे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म डाऊन

आऊटेजचा परिणाम झालेल्या अॅप्समध्ये पीएसएन, डिस्ने + हॉटस्टार, जी 5 आणि सोनीलिव्ह सारख्या स्ट्रीमिंग सेवांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त झोमॅटो, अॅमेझॉन आणि पेटीएम यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. पेटीएमनेही ट्विट करून याबाबत माहिती दिली. Akamai वेब इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जागतिक पातळीवरील उद्भवलेल्या समस्येमुळे त्याच्या काही सेवांवर परिणाम झाला आहे, अशी माहिती पेटीएमने ट्विट करत दिलीय.

ते आपली सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहेत

त्याच वेळी डिस्ने + आणि हॉटस्टारकडून यासंदर्भात माहिती देण्यात आलीय. तसेच ते आपली सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे वापरकर्ते इच्छा असूनही या सेवा वापरू शकत नाहीत. आमची टीम लवकरात लवकर हे सुनिश्चित करण्याचे काम करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये अमेरिकन बँकांच्या आणि डेल्टा एअरलाइन्सच्या संकेतस्थळांचा समावेश आहे.

आऊटेजची समस्या यापूर्वीही उद्भवली होती

याआधीही आउटेजची समस्या जगभरातील देशांमध्ये उद्भवली होती. काही काळापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम यांसारखे अ‍ॅप्ससुद्धा 45 मिनिटे बंद झाले होते. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यानं वापरकर्ते मेसेज पाठवण्यात असमर्थ ठरले होते. परंतु ते स्वत: व्हॉट्सअॅप सर्व्हरशी कनेक्ट करण्यात अयशस्वी झाले होते.

व्हॉट्सअॅप जागतिक स्तरावर वापरकर्त्यांसाठी डाऊन झाले होते

व्हॉट्सअॅप जागतिक स्तरावर वापरकर्त्यांसाठी डाऊन झाले होते. त्याशिवाय इन्स्टाग्रामही वापरकर्त्यांसाठी डाऊन झाले होते, अशी माहिती डाऊनडेक्टर वेबसाईटनं दिली होती. डाऊन डिटेक्टरवर 11,000 हून अधिक लोकांनी व्हॉट्सअॅप सेवेची समस्या उद्भवली, तर सुमारे 12,000 लोकांनी इन्स्टाग्रामवर तक्रारी नोंदवल्या. काही मिनिटातच 38,000 हून अधिक लोक होते, ज्यांनी डाऊन डिटेक्टरवर व्हॉट्सअॅप सेवेमध्ये समस्या नोंदविली. दुसरीकडे इन्स्टाग्रामने सुमारे 30,000 लोकांना काही काळानंतर समस्या असल्याचे नोंदविले.

संबंधित बातम्या

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

5G Network: जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल आणि टाटा एकत्र

Hotstar, Sonilive and Zomato Down in many parts of the world, unnecessarily annoying to users

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.